पत्नीने आधी बंदूक खरेदी केली, मग इन्शुरन्सच्या ११ कोटी रूपयांसाठी पतीचा खेळ केला खल्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:41 PM2022-05-26T15:41:15+5:302022-05-26T15:42:46+5:30

US Crime News : महिलेने ६३ वर्षीय पती आणि व्यवसायाने शेफ डेनिअल ब्रॉफीची गोळी झाडून हत्या केली होती. तेव्हा महिलेचा पती Oregon Culinary Institute मध्ये काम करत होता.

US Woman kills husband to get 11 crores rupees from insurance | पत्नीने आधी बंदूक खरेदी केली, मग इन्शुरन्सच्या ११ कोटी रूपयांसाठी पतीचा खेळ केला खल्लास!

पत्नीने आधी बंदूक खरेदी केली, मग इन्शुरन्सच्या ११ कोटी रूपयांसाठी पतीचा खेळ केला खल्लास!

Next

US Crime News : How to Murder Your Husband या टायटलसोबत रोमॅंटिक कथा लिहिणारी महिला रायटरने आपल्याच पतीची हत्या केली. २०१८ मध्ये तिने पतीची हत्या केली होती. आता तिला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. 

७१ वर्षीय अमेरिकन लेखिका नॅन्सी क्राम्पटन ब्रॉफीवर सेकंड डिग्री मर्डरचा आरोप सिद्ध झाला आहे. तिने ६३ वर्षीय पती आणि व्यवसायाने शेफ डेनिअल ब्रॉफीची गोळी झाडून हत्या केली होती. तेव्हा महिलेचा पती Oregon Culinary Institute मध्ये काम करत होता.

पोलिसांनी सांगितलं की, डेनिअलवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना ते मृत आढळून आले होते. तक्रारदारांनी दावा केला होता की, नॅन्सीने पतीची हत्या केली कारण तिला लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे ११ कोटी रूपये मिळवायचे होते. खास बाब म्हणजे पतीच्या मृत्यूच्या काही महिन्यांआधीच नॅन्सीने एक गन खरेदी केली होती.

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डेप्युटी डिस्ट्रिक अटॉर्नी शॉन ओवरस्ट्रीट म्हणाले की, नॅन्सीने आधीच प्लानिंग करून ठेवली होती. केवळ ती एकटीच आहे जिच्याकडे हत्येचा मोटिव होता. नॅन्सीनेच पतीची हत्या केली आहे.

नॅन्सीच्या वकिलांनी दावा केला की, तिने तिच्या नॉवेलसाठी गन खरेदी केली. त्या नॉवेलमध्ये महिला, गन पार्ट्स जमा करून एक हत्यार बनवते आणि अत्याचारी पतीची हत्या करते. डिफेंसने सांगितलं की, नॅन्सी आणि तिच्या पतीत २५ वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत प्रेमाचं नातं होतं.

Oregon Live नुसार, ८ तासांच्या सुनावणीत अखेर ज्युरीतील ५ पुरूष आणि ७ महिलांन नॅन्सीला दोषी ठरवलं. नॅन्सीची वकील लिजा मॅक्सफील्डने सांगितलं की, आता ते लोक अपीलचा प्लान करत आहे. 

डेनिअलची हत्या २ जून २०१८ ला Oregon Culinary Institute मध्ये झाली. ते तिथे २००६ पासून काम करत होते. विद्यार्थ्यांनी त्यांना किचनच्या फ्लोरवर पडलेलं बघितलं. त्यांच्या मृत्यू अर्धा तासआधी नॅन्सी ड्राइव्ह करत इन्स्टिट्यूटच्या आत जाताना दिसली होती.

२० मिनिटांनंतर नॅन्सी तेथून बाहेर जाताना दिसली. नंतर ती घराकडे गेली. रिपोर्टनुसार, नॅन्सीने कोर्टात सांगितलं की, तिला या ट्रिपबाबत आठवत नाही. पण तक्रारदारांचं म्हणणं आहे की, नॅन्सीकडे हत्येचं कारण होतं.

२०११ मध्ये Seeing Jane च्या साइटवर नॅन्सीने एक ब्लॉग पोस्ट केला होता. ज्याचं टायटल How to Murder Your Husband होतं. या ब्लॉगमध्ये तिने पतीला जीवे मारण्याच्या ५ संभावित उद्देशाबाबत सांगितलं होतं. यात तिने हत्या करण्याचे हत्यार आणि पद्धतीबाबत सांगितलं होतं.
 

Web Title: US Woman kills husband to get 11 crores rupees from insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.