महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं केलं होतं लैंगिक शोषण, मग केलं त्याच्याशी लग्न; कोर्टाने केस घेतली मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:22 PM2022-02-02T12:22:48+5:302022-02-02T12:23:13+5:30
इथे २६ वर्षीय हायस्कूल महिला शिक्षिका बेली टर्नर (Baylee Turner) ला एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता.
एका महिला शिक्षिकेवर सुरू असलेली लैंगिक शोषणाची केस (Sexual Assault Case) कोर्टाने मागे घेतली आहे. महिला शिक्षिकेवर आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोपा होता. मात्र, आता या महिला शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यासोबत लग्न केलं. त्यामुळे तिच्या विरोधात सुरू असलेली लैंगिक शोषणाची केस मागे घेण्यात आली आहे.
हे प्रकरण आहे अमेरिकेतील (America) Missouri चं. इथे २६ वर्षीय हायस्कूल महिला शिक्षिका बेली टर्नर (Baylee Turner) ला एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता. कथितपणे बेली टर्नरने पोलिसांसमोर मान्य केलं होतं की, तिने जानेवारी २०१९ मध्ये आपल्या घरात विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते.
हे प्रकरण समोर आल्यानंतर बेली टर्नरला अटक करण्यात आली होती आणि तिच्यावर कोर्टात केस सुरू होती. फेब्रुवारी २०१९ नंतर बेलीने Sarcoxie हायस्कूलमधून राजीनामा दिला होता. इतकंच नाही तर तिला तिचं टिचिंग लायसन्सही सरेंडर करावं लागलं होतं.
आता बेली टर्नरवर सुरू असलेली Sexual Assault ची केस कोर्टाने मागे घेतली आहे. रिपोर्टनुसार, बेलीने 'पीडित' विद्यार्थ्यासोबत लग्न केल्यानंतर तिच्या विरोधातील Sexual Assault ची केस मागे घेण्यात आली आहे.
The Joplin Globe च्या रिपोर्टनुसार, याप्रकरणी विद्यार्थ्याचं महिला शिक्षिकेसोबत लग्न केल्याने पती-पत्नी विशेषाधिकार लक्षात घेता कोर्टाने बेली टर्नर विरोधातील सर्व आरोप मागे घेतले आहे. मात्र, अजून हे स्पष्ट नाही की, दोघांना लग्न कधी केलं. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोर्टाच्या कागदपत्रांमध्येही विद्यार्थ्याचं वय सांगण्यात आलेलं नाही.