गे पार्टनर निघाला HIV पॉझिटिव्ह तर बॉयफ्रेन्डने रागात येऊन केली हत्या, बाथटबमध्ये लपवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:44 AM2022-03-19T11:44:50+5:302022-03-19T11:45:58+5:30
America Crime News : कॅलिफोर्निया पोलिसांनुसार, बॅरनने गेळा आवळून गॅरी रूबीची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह क्रॉंकिटच्या मदतीने बाथटबमध्ये दाबला होता.
America Crime News : अमेरिकेत २३ वर्षीय जुआन तेजदोर बॅरन नावाच्या तरूणाला ७३ वर्षीय वयोवृद्ध गॅरी रूबीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. असं सांगितलं जात आहे की, मृत व्यक्तीचे गॅरी बॅरनसोबत संबंध होते. पण जेव्हा बॅरनला समजलं की गॅरी HIV पॉझिटिव्ह आहे. तर त्याने त्याची गळा आवळून हत्या केली.
कॅलिफोर्निया पोलिसांनुसार, बॅरनने गेळा आवळून गॅरी रूबीची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह क्रॉंकिटच्या मदतीने बाथटबमध्ये दाबला होता. डेली मेलनुसार, सध्या बॅरनने आपल्या प्रियकराची हत्या केल्याची बाब मान्य केली. पोलिसांनी गेल्या बुधवारी त्याला अटक केली होती. सोबतच गॅरी रूबीच्या मृतदेह त्याच्या १६ कोटी रूपयांच्या आलिशान बंगल्यातून ताब्यात घेतला होता.
पोलिसांच्या रिपोर्टनुसार, बॅरनने सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये संबंध ठेवल्यानंतर त्याला गॅरी HIV पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. ज्यानंतर रागात बॅरनने बेल्टने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येनंतर बॅरनने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो पकडला गेला.
असं सांगितलं जात आहे की, बॅरनने डिनरवेळी गॅरीचा गळा आवळला. गॅरीचा जीव जाईपर्यंत त्याने बेल्टने गळा आवळून धरला होता. त्यानंतर बॅरनने गॅरीला बाथटबमध्ये ओढत नेलं आणि नंतर चाकूने त्याची हाताची नस कापली. त्याचा उद्देश हत्येला वेगळं वळण देणं होता.
इतकंच नाही तर हत्येनंतर बॅरनने गॅरीच्या महागड्या कार आणि घर स्वत:चं असल्याचं सांगितलं. पोलिसांना बॅरनने सांगितलं की, त्याने मृत व्यक्तीकडून हे खरेदी केलं होतं. सध्या हत्या, चोरी आणि चौकशीत चुकीची माहिती देणे सारख्या केसेस जुआन तेजदोर बॅरनवर सुरू आहेत.