"हमासचे हात...", ओलिसांमध्ये अमेरिकन नागरिकाचा मृदेह आढळल्याने कमला हॅरिस भडकल्या; केलं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 04:09 PM2024-09-01T16:09:55+5:302024-09-01T16:10:41+5:30
कमला हॅरिस म्हणाल्या, 7 ऑक्टोबरला अमेरिकन हर्ष गोल्डबर्ग-पोलिनला हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवले होते. तो केवळ 23 वर्षांचा होता आणि मित्रांसोबत एका संगित कार्यक्रमासाठी गेला होता.
गाझा पट्टीतील रफाह शहरामध्ये हमासच्या बोगद्यात एका अमेरिकन तरुणासह सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी मोठे विधान केले आहे. हमासला एक 'दुष्ट दहशतवादी संघटना' असल्याचे संबोधत, त्यांचे हात आणखीही काही अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने माखलेले असल्याचे म्हटले आहे. हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन या अमेरिकन तरुणाच्या मृत्यूसंदर्भात त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्याच्या पालकांप्रतीही संवेदना व्यक्त केल्या आहेत.
कमला हॅरिस म्हणाल्या, 7 ऑक्टोबरला अमेरिकन हर्ष गोल्डबर्ग-पोलिनला हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवले होते. तो केवळ 23 वर्षांचा होता आणि मित्रांसोबत एका संगित कार्यक्रमासाठी गेला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी त्याची हत्या केल्याचे वृत्त आहे. त्याचा मृतदेह इतर पाच बंधकांच्या मृदेहांसह ताब्यात घेण्यात आला आहे.
आम्ही पीडीत कुटुंबीयांसोबत -
कमला हॅरिस यांनी गोल्डबर्गचे पालक जॉन पोलिन आणि रॅचेल गोल्डबर्ग-पॉलिन यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपण हर्षला ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणआल्या, "या वर्षाच्या सुरुवातीला मी जेव्हा जॉन आणि रॅचेल यांना भेटले होते, तेव्हा मी त्यांना सांगितले की ते एकटे नाहीत. अमेरिकन आणि जगभरातील लोक जॉन, रेचेल आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतील."
कमला म्हणाल्या, "हमासकडून इस्रायली आणि इस्रायलमधील अमेरिकन नागरिकांना असलेला धोका संपुष्टात यायला हवा. हमास गाझावर नियंत्रण करू शकत नाही. पॅलेस्टिनी जनतेलाही हमासच्या राजवटीत जवळपास दोन दशके त्रास सहन करावा लागला आहे."
ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करेल -
कमला म्हणाल्या, व्हीपी या नात्याने अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता आपल्यासाठी सर्वात महत्वाची आहे. मग ते जगात कुठेही असोत. राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि आपण अमेरिकन आणि गाझामध्ये ओलिस असलेल्या सर्वांना मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहोत त्याशिवाय मागेहटणार नाही.