सतत फेसबुक वापरणे आरोग्यासाठी आहे घातक

By Admin | Published: April 23, 2017 11:22 AM2017-04-23T11:22:41+5:302017-04-23T11:22:41+5:30

फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणे आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणे यावरून आपले आवडीनिवडी कळतात.

Using Facebook continuously is dangerous for health | सतत फेसबुक वापरणे आरोग्यासाठी आहे घातक

सतत फेसबुक वापरणे आरोग्यासाठी आहे घातक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 23 - फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणे आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणे यावरून आपले आवडीनिवडी कळतात. पण आपला स्वभावपण कळतो आणि नुकतेच एका अभ्यासावरून समोर आले आहे की, सतत पोस्ट अपडेट करणे व पोस्ट लाईक करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठानं यासंबंधी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या अभ्यासासाठी सरासरी 48 वर्षांच्या 5200 लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठानं केलेल्या या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन 1 ते 4 मध्ये नोंदवलं. तर लाईफ सॅटिस्फॅक्शन 1 ते 10 मध्ये नोंदवलं. तसंच बॉडी मास इंडेक्सचीही माहिती दिली. या संशोधनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांचा फेसबुकचा डेटा वापरण्याची परवानगीही संशोधकांना दिली होती.

यामुळे संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याच्या सवयी आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याची सवय याचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करता आला. या संशोधनात सतत फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं आणि इतरांच्य़ा पोस्ट लाईक करणं यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो असा निष्कर्ष काढण्यात आला.

Web Title: Using Facebook continuously is dangerous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.