शिक्षकांना प्राधान्याने लस द्या; अध्यक्ष बायडेन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:04+5:302021-03-04T05:08:22+5:30

अमेरिकेतील सर्व शिक्षकांना मार्च अखेरपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश बायडेन यांनी राज्यांना दिला आहे.

Vaccinate teachers preferably; President Biden's announcement | शिक्षकांना प्राधान्याने लस द्या; अध्यक्ष बायडेन यांची घोषणा

शिक्षकांना प्राधान्याने लस द्या; अध्यक्ष बायडेन यांची घोषणा

Next


वॉशिंग्टन : अमेरिकेमधील सर्व प्रौढ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा मे महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. तसेच अमेरिकेतील सर्व शिक्षकांना मार्च अखेरपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश बायडेन यांनी राज्यांना दिला आहे.


हा साठा जुलै अखेरपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार होता. मात्र, हे उद्दिष्ट आता दोन महिने आधीच पूर्ण करण्याचे जो बायडेन सरकारने ठरविले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या नव्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी त्या कंपनीस अमेरिकेतील मर्क कंपनी मदत करणार आहे. त्यामुळे कोरोना लसीचा पुरेसा साठा मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकेल. 
अमेरिकेतील सर्व शिक्षकांना मार्च अखेरपर्यंत कोरोना लसीचा एक डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश बायडेन यांनी राज्यांना दिला आहे.

चीनमध्ये ४०% ना जूनपर्यंत लस 
nचीनमधील ४० टक्के नागरिकांना जूनपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे लक्ष्य तेथील सरकारने ठेवले आहे. चीनमध्ये कोरोना साथीची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही तेथील सरकारने केला आहे. 
nराष्ट्रीय आरोग्य आयोगाशी संलग्न वैद्यकीय तज्ज्ञांच्या गटाचे प्रमुख झोंग नॅनशान यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीपासून चीनमध्ये सव्वापाच कोटी कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. 
nचीनने गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना कोरोना लस देण्याची मोहीम सुरू केली होती. 
सिरियाला भारत पुरविणार लस 
nयादवी युद्धाने घेरलेल्या सिरियाला आता कोरोना साथ, अन्नाचा तुटवडा, कडक थंडीने वेढले आहे. या देशाला संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने कोरोना लसीचा पुरवठा करण्याची तयारी भारताने दाखविली आहे.  
nसिरियातील मानवी हक्कांच्या स्थितीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत के. नागराज नायडू यांनी ही माहिती दिली. 

Web Title: Vaccinate teachers preferably; President Biden's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.