लस घेतल्याने युवती झाली कोट्यधीश; लॉटरीच्या रकमेतून पालकांना मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:37 AM2021-11-09T08:37:18+5:302021-11-09T10:38:05+5:30
३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेल्यांनाही या लॉटरी योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते.
कॅनबेरा : आपण सुमारे साडेपाच कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे, या बातमीवर ऑस्ट्रेलियातील जोन झू (वय २५ वर्षे) या युवतीचा अजूनही विश्वास बसायला तयार नाही. इतका तिच्यासाठी तो मोठा सुखद धक्का होता. त्या देशातील अधिकाधिक नागरिकांना कोरोना लस घेण्यास प्रोत्साहन देण्याकरिता २० उद्योगपती व महापालिकांनी एकत्र येऊन लस घेतलेल्यांकरिता सुरू केलेली लॉटरी जोनला लागली आहे.
३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेल्यांनाही या लॉटरी योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते.
सुमारे २७ लाख लोकांनी या लॉटरी योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यातील जोन झूचे नशीब उघडले. ती मूळची चीनची रहिवासी आहे. ती १० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आली. जोन झूने सांगितले की, कोरोना साथीमुळे सध्या असलेले निर्बंध शिथिल झाले तर मला विमानप्रवास करून चीनला जायचे आहे. चिनी नववर्षदिनी माझ्या पालकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी द्यायची आहे.