पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनमध्ये तोडफोड, जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 03:33 PM2024-07-26T15:33:10+5:302024-07-26T15:44:28+5:30

आजपासून ऑलिम्पिक सुरू होणार आहे, जगभरातील खेळाडू फ्रान्समध्ये पोहोचले आहे. उद्घाटनापूर्वीच पॅरिसमधून एक मोठी अपडेट आली आहे.

Vandalism, arson on France's high-speed train ahead of Paris Olympics opening | पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनमध्ये तोडफोड, जाळपोळ

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनमध्ये तोडफोड, जाळपोळ

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आजपासून २०२४ च्या ऑलिम्पिकची सुरुवात होणार आहे. याआधीच पॅरिसमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. पॅरिस मधील हायस्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे तेथील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. ८ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. 

दरम्यान आता या प्रकरणी फ्रेंच रेल्वे कंपनीने एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ऑलिम्पिकपूर्वी पॅरिसमधील ट्रेनचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

'कोणत्याही देशासाठी चीनसोबतचे संबंध खराब करणार नाही'; पाकिस्तानने अमेरिकेला दाखवला आरसा
 
एसएनसीएफ या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीने सांगितले की, जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांनी पॅरिसला देशाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गांना लक्ष्य केले. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू होत असताना आणि आठवड्याच्या शेवटी गर्दी वाढणार होती अशा वेळी हे हल्ले करण्यात आले आहेत. आता यामुळे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अनेक मार्गांवरील ट्रेन ऑपरेशन्स स्थगित

टीजीव्ही नेटवर्कला खराब करण्याच्या उद्देशाने हा हल्ला आहे. यामुळे अनेक मार्गांवरील ट्रेन ऑपरेशन्स स्थगित करणे भाग पडले आहे आणि किमान वीकेंडपर्यंत हे बंद ठेवाले लागेल. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ते बंद ठेवावे लागणार आहे, असंही यात म्हटले आहे. 

रात्रीच्या अंधारात गाड्यांची तोडफोड केली आहे. यामुळे अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न लाईनवरही परिणाम झाल्याचे फ्रेंच राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटरने म्हटले आहे. यात अनेक महत्त्वाच्या केबल्स कापून जाळण्यात आल्या आहेत. ऑपरेटरने सांगितले की, हल्ल्यांमुळे सुमारे ८००,००० फ्रेंच लोकांच्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत.

एसएनसीएफ दिलेली माहिती अशी, हे हल्ले नियोजित रेल्वे नेटवर्कवरील महत्त्वाच्या ठिकाणांवर केले आहेत. फ्रान्सचे क्रीडा मंत्री अमेली ओडे-कॅस्टेरा यांनी या भ्याड कृत्याचा निषेध केला. 

Web Title: Vandalism, arson on France's high-speed train ahead of Paris Olympics opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.