अंतराळातील वाहतुकीचा खर्च घटविणारे वाहन

By admin | Published: September 20, 2015 10:32 PM2015-09-20T22:32:36+5:302015-09-20T22:35:50+5:30

युनिव्हर्सिटी आॅफ सिडनीचा विद्यार्थी पॅडी न्यूमन याने विद्युतभारित कणांचे अंतराळ वाहन तयार केले असून त्याने नासाचे सध्याचा इंधनाचा कमाल वापर करण्याचा विक्रम मोडीत

Vehicles that reduce air traffic costs | अंतराळातील वाहतुकीचा खर्च घटविणारे वाहन

अंतराळातील वाहतुकीचा खर्च घटविणारे वाहन

Next

मेलबोर्न : युनिव्हर्सिटी आॅफ सिडनीचा विद्यार्थी पॅडी न्यूमन याने विद्युतभारित कणांचे अंतराळ वाहन तयार केले असून त्याने नासाचे सध्याचा इंधनाचा कमाल वापर करण्याचा विक्रम मोडीत काढल्याचे समजले जात आहे.
न्यूमन हा विद्यापीठाचा भौतिकशास्त्राचा डॉक्टरेटचा विद्यार्थी आहे. आयन प्रोपल्शन (विद्युतभाराने पुढे ढकलणे) हे असे तंत्रज्ञान आहे की त्यात अंतरीक्ष यान पुढे ढकलण्यासाठीच्या वायूचे विद्युतभारित कणांत रूपांतर होते. अंतराळ यानाला प्रेरक शक्ती म्हणून पारंपरिक रासायनिक गॅसचा वापर करण्याऐवजी गॅस झेनोन (हा गॅस न्यूआॅन किंवा हेलियमसारखा; परंतु जड असतो) विजेची शक्ती देतो किंवा विद्युतभारित कणांत रूपांतर होतो.
नासाचा सध्याचा इंधनाच्या कमाल वापराचा विक्रम हाय पॉवर इलेक्ट्रिक प्रॉपल्शन (एचआयपीईपी) सिस्टीमचा आहे. ही सिस्टीम निश्चित अशा प्रेरक शक्तीचे ९,६०० (प्लस/मायनस २००) सेकंद देते. पॅडी न्यूमनने हीच शक्ती १४,६९० (प्लस/मायनस २,०००) एवढी विकसित केली आहे, असे होनी सोईट या विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. नासाची एचआयपीईपी ही सिस्टीम झेनोन गॅसवर चालते, तर न्यूमनची वेगवेगळ्या धातूंवर. त्याने केलेली सर्वात चांगली चाचणी होती ती मॅग्नेशियमवर. न्यूमनच्या सिस्टीमने नासाच्या सिस्टीमला इंधनाच्या कार्यक्षमतेत मागे टाकले तरी ती गती वाढवू शकलेली नाही; मात्र अंतराळात यान वा अन्य साहित्य पाठविण्यासाठी इतर प्रेरक शक्तीला न्यूमनची शक्ती जोडता येऊ शकते.
न्यूमनचे वाहन हे प्रामुख्याने धातूंवर (तेही अंतराळात सापडणाऱ्या टाकून दिलेल्या) व बाद झालेल्या उपग्रहांचा फेरवापर करून चालू शकेल. न्यूमनच्या वाहनामुळे अंतराळातील वाहतुकीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रचंड खर्चात कपात होऊ शकते. उपग्रह भ्रमणकक्षेत प्रदीर्घकाळ ठेवण्यास व अंतराळातील फार लांबचा प्रवास करण्यास याचा उपयोग होऊ शकतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Vehicles that reduce air traffic costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.