आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:45 AM2019-08-18T05:45:01+5:302019-08-18T05:50:01+5:30

भारताच्या काश्मीरविषयीच्या निर्णयामुळे पाकिस्तान बिथरला असून, त्यामुळेच ही भाषा करीत आहे.

Veiled nuclear war threat reminder of India's thirst for violence, says FM Qureshi | आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती

आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती

Next

इस्लामाबाद : आम्ही युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे उद्गार पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी शनिवारी सांगितले. त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी हेही होते.
भारताच्या काश्मीरविषयीच्या निर्णयामुळे पाकिस्तान बिथरला असून, त्यामुळेच ही भाषा करीत आहे. भारत आमच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. पण आम्हीही युद्धासाठी तयार आहोत, असे सांगून गफूर म्हणाले की, नियंत्रण रेषेपाशी आम्ही सर्व ती तयारी करून ठेवली आहे.
परराष्ट्रमंत्री म्हणाले की, काश्मीरबाबतच्या घटनांची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालयात विशेष सेलची स्थापन करीत आहोत. अण्वस्त्रांबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढलेल्या उद्गारांवर कुरेशी यांनी टीका केली. ते म्हणाले की, भारताचे संरक्षणमंत्री बेजबाबदारपणे बोलत आहेत. (वृत्तसंस्था)

भारतीय जवान शहीद
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये शनिवारी नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचा भंग करीत तेथील चौक्या आणि गावांमध्ये केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला. लान्स नायक संदीप थापा (वय ३५) असे जवानाचे नाव असून तो मूळचा डेहराडूनचा होता. नौशेरामध्ये शनिवारी सकाळपासूनच पाकिस्तानने गोळीबार सुरु केला. याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. राजौरी जवळ असलेल्या पाकिस्तानी चौक्यांवरही भारताकडून हल्ला करण्यात आला. दोन्ही बाजूंनी बराच काळ गोळीबार सुरुच होता.

Web Title: Veiled nuclear war threat reminder of India's thirst for violence, says FM Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.