व्हेनेझुएलात सत्ताधारी पराभूत
By admin | Published: December 8, 2015 11:28 PM2015-12-08T23:28:42+5:302015-12-08T23:28:42+5:30
मंदीसह अनेक संकटांच्या गर्तेत अडकलेल्या व्हेनेझुएलामध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष निकोलस मडुरो यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकांना सामोरा गेला होता.
कॅराकस : मंदीसह अनेक संकटांच्या गर्तेत अडकलेल्या व्हेनेझुएलामध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष निकोलस मडुरो यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकांना सामोरा गेला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला. निकाल जाहीर होताच मडुरो यांनी टीव्हीवरून हा निकाल मान्य असल्याचे सांगितले. विरोधकांना सरकारला सत्तेवरुन बाजूला सारण्यात यश आले असले तरी त्यांच्यासाठी पुढील वाटचाल सोपी नाही. देशात मंदी, बेकारी व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांचा डोंगर उभा आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेल्या निकालात संसदेच्या एकूण १६७ जागांपैकी ११० जागा विरोधी पक्षाला, तर केवळ ५५ जागा सत्ताधारी समाजवादी पक्षाला मिळाल्या होत्या. (वृत्तसंस्था)