वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी या पठ्ठ्याने ट्रेनच नेली खेचत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:39 AM2019-12-22T01:39:10+5:302019-12-22T01:39:32+5:30
संडे अँकर । रशियातील प्रकार; पण काही भारतीयांनीही यापूर्वी केले आहेत असे अनेक विक्रम
एखाद्या पहिलवानाला २०० ते ३०० किलो वजन उचलताना खूप त्रास होतो, पण रशियातील एका व्यक्तीने २१७ टन म्हणजेच १ लाख ९७ हजार किलो वजनाची ट्रेन खेचून वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे. त्याचं नाव इवान सौकिन आहे. त्याने हा प्रकार व्लादिवोस्तोक या शहरात केला आहे. इवान हा संपूर्ण त्याच्या शहरात व रशियातही ह्युमन माउंटन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने इतकं वजन उचलण्यासाठी गेले वर्षभर खूप मेहनत केली होती, असं सांगण्यात येतं.
या इवानने वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी ही कामगिरी करून दाखविली. यापुढे १२ हजार चारशे टन वजनाच्या जहाजाला खेचण्याचा प्रयत्न हा इवान करणार आहे. एवढे जास्त वजन खेचण्याचा प्रयत्न हा त्याचा प्रयत्न पहिला नसून, आतापर्यंत भारतातील अनेक जणांनीही असे विक्रम करून दाखविले आहेत. भारतातील वेलू राधाकृष्णन नावाच्या इसमाने १८ आॅक्टोबर, २००३ साली मलेशियातील क्वालालंपूर रेल्वे स्थानकात असाच विक्रम केला होता. त्याने आपल्या दातांनी २६०.८ टन वजनाच्या २ केटीएम ट्रेन्स ४.२ मीटर अंतरापर्यंत खेचून वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखविला होता. मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ब्रह्मचारी आशिष या इसमानेही ६५ टन वजनाच्या रेल्वे इंजिनाला आपल्या दातांनी खेचलं होतं. ग्वाल्हेरमध्ये राहणाºया आरती आणि सविता यांनी नॅरोगेज ट्रेनच इंजिन खेचलं होतं. हा पराक्रम केल्यामुळे सविता आणि आरती यांची नावे लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आली आहेत.
सर्वसाधारणपणे होणाºया पत्नीला म्हणजेच वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी पुरुष वेगवेगळे प्रयत्न करत असतात, पण पत्नीला इम्प्रेस करायला एखाद्याने वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे ऐकलेय का? रशियाच्या एका पठ्ठ्याने होणाºया बायकोला इम्प्रेस करण्यासाठी लढविलेली शक्कल जाणून घ्यायलाच हवी.