Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:34 PM2020-09-07T16:34:40+5:302020-09-07T16:36:33+5:30

India China faceoff: भारतीय सैन्याने गेल्या आठवड्यात चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न पाहून पेंगाँग तलाव परिसरातील उंचीवरील मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. यामुळे चीनला ही डोंगररांगामधील कसरत भारी पडली असून त्याचा सराव करण्यासाठी ही वाहने आणि सैन्य मोठ्या प्रमाणावर युद्धसरावासाठी तैनात केले आहे.

Video: 100 military vehicles, 1000 soldiers; China exercises war ladakh border | Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

Next

बिजिंग : लडाखमध्येचीन कुरापती बंद करण्याचे नाव काढत नाहीय. सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न फसल्य़ाने चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहे. 


भारतीय सैन्याने गेल्या आठवड्यात चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न पाहून पेंगाँग तलाव परिसरातील उंचीवरील मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. यामुळे चीनला ही डोंगररांगामधील कसरत भारी पडली असून त्याचा सराव करण्यासाठी ही वाहने आणि सैन्य मोठ्या प्रमाणावर युद्धसरावासाठी तैनात केले आहे. चीनचा सरकारी न्यूज चॅनल सीजीटीएनने याबाबतचा व्हिडीओ जारी केला असून यामध्ये लाईव्ह फायर ड्रील करत असल्याचे म्हटले आहे. 
हे सैनिक 100 गाड्यांमधून इथे पोहोचले आहेत. त्यांनी चीनच्या रेल्वेलाईनद्वारे 2000 किमीचा प्रवास केला आहे. या लाईव्ह फायर ड्रीलमध्ये तोफा, रणगाडे आणि मिसाईल वापरण्यात येणार आहेत. सीजीटीएनचा न्यूज प्रोड्युसर शेन शी वेई याने याचा व्हिडीओ पोस्ट करून ''वाट पहा'' असे म्हणाला आहे. 

"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार


चीनने एकीकडे लडाखमधील चर्चा सुरु ठेवून पेगाँग झीलमध्ये पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने चीनच्या सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडत चिनी सैनिकांना माघारी हाकलले होते. याचा राग मनात ठेवून चीनने युद्धसराव सुरु केला आहे. पहाडी भागातील वातावरण आणि तेथील भूरचनेमुळे चिनी सैनिकांना वेगवान हालचाली करणे मुश्किल बनले आहे. याचाच फायदा घेत भारतीय जवानांनी चपळाईने पेंगाँग झीलवरील उंच शिखरांवर कब्जा करत चीनच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. 


चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार : रावत
चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वी सीमेवर य़ुद्धसदृष्य परिस्थिती असल्याचे संकेत दिले होते. सांगितले की, लडाखमध्ये चिनी सेनेला मागे हटविण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरु आहेत. मात्र, सैन्य आणि राजनैतिक चर्चा अपयशी ठरली तर शेवटी सैन्य़ कारवाईचा पर्यायावर विचार केला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. एलएसीवर वादाचे कारण सीमारेषेबाबत वेगवेगळे विचार असतात. चीन आताही पेगाँग तलावाच्या परिसरात तळ ठोकून आहे. तो फिंगर5 पासून मागे हटण्यास तयार नाहीय. यावर रावत यांनी सैन्य पर्याय काय़ असतील यावर बोलण्यास नकार दिला. एलएसीवर वाद सोडविण्यासाठई भारत आणि चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून अनेकदा सैन्य अधिकाऱ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. यामध्ये लेफ्टनंट, जनरल स्तरावरील चर्चा आहेत. राजनैतिक स्तरावरही चर्चा सुरु आहेत. संयुक्त सचिव स्तराचे अधिकारी चीनसोबत चर्चा करत आहेत. दोन्ही बाजुंकडून चीनवर तणाव कमी करण्यावर बोलणी केली जात आहेत. मात्र, अद्यापही एलएसी वादावर तोडगा निघालेला नाही. फिंगर आणि डारला भागात चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी युद्धाभ्यास करत आहे. अशातच रावत यांनी सैन्य पर्यायाचे वक्तव्य करत चीनला मोठा इशारा दिला आहे. 

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

चीनची अट भारताला अमान्य
आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. उलट फिंगर चारमध्ये भारतीय सैनिक गेल्या सहा दशकांपासून तैनात असल्याने मागे हटणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांपासून चीनी ड्रॅगनची भारताने वेगवेगळ्या स्तरावर कोंडी केली आहे. चीनने स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले.

चीनला सतावतेय दौलत बेग ओल्डी
चीनच्या प्रत्येक षडयंत्राला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहेत. चीनच्या या अस्वस्थतेचे मुख्य कारण म्हणजे दौलत बेग ओल्डी (डीबीओ) प्रदेशातील भारतीय सैन्याची ताकद आहे. जगातील सर्वात उंच हवाई पट्टी आणि सैन्य शिबिरामुळे डीबीओ संपूर्ण लडाखमध्ये भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे. भारतीय सैन्याची वाढती संख्या आणि या भागाचे मोक्याचे, मुत्सद्दी महत्त्व यामुळे चीन येथे कट रचत आहे. त्याचबरोबर हा वाद आणखी वाढल्यास चीनला जबर नुकसान सोसावं लागू शकतं, अशीही भीतीही त्याला सतावते आहे.  

डीबीओ हे एक असं क्षेत्र आहे जिथून भारतीय सैन्य चीनच्या अक्साई चीनमधील हालचालींवर लक्ष ठेवते. काराकोरम, अक्साई चीन, जियांग, गिलगिट-बाल्टिस्तान व गुलाम कश्मीरपर्यंत चीनच्या महत्त्वाकांक्षांना रोखण्याचं आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यास डीबीओ नेहमीच तत्पर असते. सियाचीनमधील भारतीय सैन्यदलासाठीही हा मजबूत आधारस्तंभ आहे. भारताच्या मध्य आशियाई जमिनीशी संपर्क साधण्यासाठी हे फार महत्त्वाचे ठिकाण आहे. डीबीओ हे काराकोरम पर्वताच्या पूर्वेला असून, भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या आठ किलोमीटर दूर ईशान्येकडे आहे. 

Web Title: Video: 100 military vehicles, 1000 soldiers; China exercises war ladakh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.