Video - बाबो! लॉकडाऊनच्या घोषणेनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा, तब्बल 700 किमीची वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 03:29 PM2020-10-31T15:29:05+5:302020-10-31T15:43:10+5:30

Paris Lockdown Video : लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली. 

Video 700 km long road jam in paris people scared of second time lockdown french | Video - बाबो! लॉकडाऊनच्या घोषणेनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा, तब्बल 700 किमीची वाहतूक कोंडी

Video - बाबो! लॉकडाऊनच्या घोषणेनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा, तब्बल 700 किमीची वाहतूक कोंडी

googlenewsNext

पॅरिस - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. पुन्हा एकदा देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली. 

पॅरिसमध्ये वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तब्बल 700 किमी लांबीची वाहतूक कोंडी झाली आहे. अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी आणि शहराबाहेर जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडल्याचं म्हटलं जातं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्याने फ्रान्समध्ये प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे.

फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान शाळा आणि काही कामाची कार्यालयं सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊनच्या नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे युरोपमधील रुग्णालयं आता अपुरी पडत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे देशात सध्या कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. शुक्रवारपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. 

फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक

लॉकडाऊनमध्ये फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. कारखाने, शेती आणि बांधकाम यांचे काम चालू ठेवता येईल. याशिवाय नर्सिंग होमसुद्धा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत फ्रान्सचा 5 वा क्रमांक आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार. मंगळवारी कोरोनामुळे फ्रान्समध्ये 530 लोकांचा मृत्यू झाला. तर 33 हजार 417 रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक आहे. तर आतापर्यंत 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 

फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू

फ्रान्समध्ये 1 लाख 13 हजार रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. 10 लाखहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. फ्रान्समध्ये आता कोरोनाची दुसरी लाट पसरायला सुरुवात झाली आहे. या लाटेचा फटका जास्तीत जास्त लोकसंख्येला बसू नये यासाठी काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली. 

Web Title: Video 700 km long road jam in paris people scared of second time lockdown french

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.