Video: इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीवर 'असा' केला हल्ला; अमेरिकेकडून पहिला व्हिडीओ जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:27 AM2019-10-31T11:27:08+5:302019-10-31T11:28:41+5:30
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे.
वॉशिंग्टनः इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीचा शनिवारी खात्मा करण्यात आला. बगदादीला मारण्यासाठी सीरियातील त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांना अमेरिकन लष्करानं लक्ष्य केलं होतं. यानंतर शनिवारी अमेरिकेने अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले होते. या मोहिमेचा व्हिडीओ अमेरिकेतील विशेष पथकाने ट्विट केला आहे. अबू बक्र अल-बगदादीला खात्मा करण्याचे मिशन जवळपास दोन तास सुरु होतं.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता.
"...at the compound, fighters from two locations in the vicinity of the compound began firing on U.S. aircraft participating in the assault."
— U.S. Central Command (@CENTCOM) October 30, 2019
- Gen Frank McKenzie CDR USCENTCOM pic.twitter.com/SkrtHNDs7w
बगदादीचा ओळख पटेल अशा स्थितीतील मृतदेह हाती लागला नाही. तरी अमेरिकी सैन्याने लगेच जागीच ‘डीएनए’ चाचणी करून मेला तो बगदादीच असल्याची पुरती खातरजमा करून घेतली, असेही ट्रम्प म्हणाले होते. या ‘डीएनए’ चाचणीसाठी बगदादीने वापरलेल्या दोन जुन्या अंडरवेयर व त्याच्या रक्ताचे नमुने सोबत घेऊनच अमेरिकी सैन्य जय्यत तयारनिशी आले होते. बगदादीच्या जुन्या अंडरवेयर व रक्ताचे नमुनेही ‘इसिस’मधील याच फितुराने कारवाईच्या काही दिवस आधी मिळवून अमेरिकी हेरांकडे सुपूर्द केले होते, असेही या सूत्रांनी सांगितले.
बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.