व्हिडिओ - कामावरुन काढलं म्हणून जेसीबीच्या सहाय्याने विमानाची तोडफोड
By admin | Published: April 28, 2016 02:43 PM2016-04-28T14:43:31+5:302016-04-28T14:43:31+5:30
रशिअन एअरलाईन्स युटी एअरच्या एका कर्मचा-याने कामावरुन काढल्याच्या रागात अक्षरक्ष: विमानाची जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मॉस्को, दि. 28 - कामावरुन तडकाफडकी काढल्यानंतर राग येणं स्वाभाविक आहे. मात्र तो कसा व्यक्त करायचा हे प्रत्येकाच्या स्वभावावर अबलंबून असतं. रशिअन एअरलाईन्स युटी एअरच्या एका कर्मचा-याने कामावरुन काढल्याच्या रागात अक्षरक्ष: विमानाची जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड केली आहे. युट्यूबवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून 3 लाखापेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
24 एप्रिलला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कर्मचारी जेसीबीच्या सहाय्याने विमानाची नासधूस करताना दिसत आहे. करोडोच्या किंमतीचं हे विमान भंगारात विकण्याच्या अवस्थेत करुन टाकलेलं दिसत आहे.
एकीकडे विमानाची नासधूस करणारा कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे काही वृत्तसंस्था हा दावा फेटाळत आहेत. रशियामध्ये बरेचदा जुनी विमाने मोडून टाकण्यात येतात आणि त्याचे भाग वेगळे करुन विकले जातात. त्यामुळे हेच काम सुरु असावं असा दावा करण्यात आला आहे.