VIDEO - ...आणि मेलेनियाने सर्वांसमोर झटकला ट्रम्प यांचा हात

By admin | Published: May 23, 2017 01:30 PM2017-05-23T13:30:11+5:302017-05-23T14:35:37+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज पत्नी मेलेनिया ट्रम्पने जागतिक मीडियासमोर चांगलीच पंचाईत केली.

VIDEO - ... and Melanie throttled hands in front of everyone | VIDEO - ...आणि मेलेनियाने सर्वांसमोर झटकला ट्रम्प यांचा हात

VIDEO - ...आणि मेलेनियाने सर्वांसमोर झटकला ट्रम्प यांचा हात

Next

 ऑनलाइन लोकमत 

तेलअवीव, दि. 23 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज त्यांच्या पत्नीनेच जागतिक मीडियासमोर चांगलीच पंचाईत केली. त्यामुळे ट्रम्प यांची सर्वांसमक्ष अवघडल्यासारखी स्थिती झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हात मेलेनिया ट्रम्पने सर्वांसमक्ष झटकला. त्यामुळे ट्रम्प पत्नीमुळेच अडचणीत आले.
 
इस्त्रायल दौ-यावर आगमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रेडकार्पेटवरुन चालत असताना त्यांनी पत्नी मेलेनिया ट्रम्पचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण मेलेनियाने त्यांचा हात चक्क झटकला. नेमके हेच दृश्य कॅमे-याने टिपले आणि मग मेलेनियाने डोनाल्ड ट्रम्प यांचा कसा अपमान केला त्याची चर्चा सुरु झाली. बेन गुरीऑन विमानतळावर ही घटना घडली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी साराही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी विमातळावर आले होते.  
 
बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी साराही ट्रम्प दांम्पत्यासोबत चालले असताना ही घटना घडली. इस्त्रायलला येण्यापूर्वी ट्रम्प रियाद येथे गेले होते. तिथे त्यांनी इस्मामिक देशांच्या प्रमुखांसमोर बोलताना भारत दहशतवादाचा बळी असल्याचे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात मुस्लिम देशांच्या नेत्यांना दहशतवादाचा खात्मा करण्याचं आवाहन केलं. या पवित्र धरतीवर दहशतवादाला थारा देऊ नका. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफही उपस्थित होते. 
 
ट्रम्प म्हणाले, दहशतवाद जगामध्ये पसरतोय. दहशतवादाचे जगभरातील जवळपास सर्वच देश बळी आहेत. काही देश दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेपासून भारत आणि रशियासारखे देशही प्रभावित होत आहेत. धर्माच्या नावाखाली चाललेला दहशतवादाचा खेळ आता बंद झाला पाहिजे असे ट्रम्प म्हणाले. सौदी अरेबियासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर काहीसा बदलल्याचं नजरेस आलं आहे. ट्रम हे दहशतवादाला उद्देशून संपूर्ण इस्लामिक दहशतवाद असा शब्द नेहमीच वापरत आले होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर पश्चिम आणि इस्लाममध्ये कोणतीच लढाई नाही. खरं तर ही  चांगले आणि वाईट यातील लढाई आहे, असंही ट्रम्प म्हणाले.

Web Title: VIDEO - ... and Melanie throttled hands in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.