जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ
By admin | Published: February 1, 2015 04:34 AM2015-02-01T04:34:36+5:302015-02-01T04:34:36+5:30
इस्लामिक स्टेट (इसीस )या दहशतवादी संघटनेने ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे.
ऑनलाइन लोकमत
अम्मान, (जोर्डान ) दि. १ - इस्लामिक स्टेट (इसीस )या दहशतवादी संघटनेने ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा सिरच्छेद केल्याचे दाखवण्यात आले आहे. मिलिटेंट वेबसाईटवर हा ऑनलाइन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. इस्लामिक स्टेटसंबंधी सहानुभूती असलेल्या काही व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. दरम्यान, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणाकडूनही दुजोरा देण्यात आला नाही.
शुक्रवारी जपानी ओलिस केंजी गोटोच्या आवाजातील नवीन संदेश जारी करून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जॉर्डनसाठी अल-काईदाशी संबंधित एका इराकी सदस्याची सुटका करण्यासाठीची मुदत वाढविली होती. इंग्रजीतील या संदेशात म्हटले होते की, जॉर्डनने सूर्यास्तापर्यंत तुर्की सीमेवर महिला अतिरेकी साजिदा अल-रिश्वीला मुक्त करावे; अन्यथा जॉर्डन वायूदलाचा वैमानिक मस-अल कसासबेहची हत्या केली जाईल. या वैमानिकाच्या सुटकेसाठी जॉर्डनने इस्लामिक स्टेटच्या एका सदस्याची सुटका करण्याची तयारी दाखविली होती.