VIDEO: बस चालवत नवी नवरी पोहचली विवाह मंडपात, वाटेत पतीलाही केलं पिकअप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 12:02 PM2018-05-30T12:02:28+5:302018-05-30T12:02:28+5:30
लग्नस्थळी पोहचण्यासाठी नववधुने चक्क बस चालवल्याचं तेथे पाहायला मिळालं.
पेइचिंग- लग्नामध्ये नवरदेव घोड्यावर बसून विवाहमंडपात येत असल्याचं आपण पाहतो. भारतामध्ये ही पद्धत जवळपास सगळीकडेच वापरली जाते. पण चीनमधील एक घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. लग्नस्थळी पोहचण्यासाठी नववधुने चक्क बस चालवल्याचं तेथे पाहायला मिळालं. स्वतः बस चालवून ही नववधू लग्नस्थळी पोहचली इतकंच नाही, तर रस्त्यात थांबून तिने तिच्या होणाऱ्या पतीलाही पिक केलं.
चीनच्या पीपल्य डेलीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये वधु बस चालवता दिसत आहे. नववधु बसणार म्हणून बससुद्धा फुलांनी व त्या दोघांच्या फोटोंनी सजविली आहे. ही नववधु स्वतः बसचालक आहे. त्यामुळे तिने आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशीही बसने प्रवास करायचं ठरवलं. 'बसमुळे कार्बन कमी प्रमाणात उत्सर्जित होईल', हा विचार करून बसचा पर्याय निवडल्याचं तिने म्हटलं. दरम्यान, सोशल मीडियावर या बस ड्रायव्हर मुलीचं खूप कौतुक होत आहे.
From pop culture themes to nostalgia-filled affairs, here is another offbeat wedding idea. A bride who works as a bus driver sends herself to the wedding hall in her own bus! pic.twitter.com/Mwy6yMMZPB
— People's Daily,China (@PDChina) May 29, 2018