VIDEO-टीव्हीवर बोलणाऱ्या विश्लेषकाच्या डोक्यावर बसले मांजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 01:58 PM2018-07-10T13:58:28+5:302018-07-10T14:29:48+5:30
मांजर थेट डोक्यावर येऊन बसले तरी राजकीय विश्लेषक मंद स्मित करत तिची शेपटी बाजूला करत बोलतच राहिले.
वॉर्सा- गेल्या वर्षी टीव्हीवरील चर्चेत सहभागी झालेल्या बाबांच्या व्हीडिओत घुसखोरी करणाऱ्या मुलीचा तुम्ही व्हीडिओ पाहिला असेलच. या मुलीला कॅमेऱ्याच्या टप्प्यातून बाहेर काढण्यासाठी त्या विश्लेषकाच्या पत्नीच्या नाकी नऊ आले होते. काही दिवसांनी हा व्हीडिओ लोकांनी डोक्यावर घेतला आणि त्या विश्लेषकाचे सर्व कुटुंबच प्रसिद्ध झाले. जगभरातील वाहिन्यांनी त्यांची एकत्र मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली. वाहिन्यांवरील चर्चेत विश्लेषणात आता एका मांजराने अडथळा आणला आहे.
The Polish historian & political scientist Jerzy Targalski remained completely unruffled during our interview when this happened👇🤨🤷♂️ pic.twitter.com/4dLi16Pq1H
— Rudy Bouma (@rudybouma) July 7, 2018
हे मांजर एका राजकीय विश्लेषकाच्या आधी खांद्यावर येऊन बसले. मांजर खांद्यावर बसले तरीही विश्लेषण सुरुच ठेवणाऱ्या त्या राजकीय तज्ज्ञांच्या डोक्यावरही ते जाऊन बसले. हा व्हीडीओ प्रसिद्ध झाल्यावर ट्वीटर तो शेकडो जणांनी रिट्वीट केला असून अनेकांनी आपापले मांजरासोबतचे फोटो ट्वीट केले आहेत.
डॉ. जेर्झी तारगाल्स्की असे या विश्लेषकांचे नाव असून ते पोलंडमधील राजकीय स्थितीबाबत चर्चेत बोलत होते. ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली असताना त्यांच्या पाळीव मांजर लिसिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते डॉ. जेर्झी यांच्या थेट डोक्यावर जाऊन बसले तरीही ते आपल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देतच राहिले. अत्यंत मंद स्मित करत बोलणारे डॉ. जेर्झी मांजराची शेपटी बाजूला करत बोलतच राहिले.
I see no difference pic.twitter.com/vO1DO0Dck8
— GrocOcre (@GrocOcre) July 9, 2018
Literally me pic.twitter.com/K32M6WNJQF
— damian🤙 (@developdar) July 8, 2018
हा व्हीडिओ रुडी बोउमा यांनी प्सिद्ध केला असून डॉक्टरसाहेबांनी मांजर डोक्यावर बसूनही आपला मुद्दा न सोडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. काही वेळातच हा व्हीडिओ वायरल झाला.