Video - चीनमध्ये पावसाचा कहर! पूल कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 10:15 AM2024-07-20T10:15:34+5:302024-07-20T10:19:41+5:30
Chinese Bridge Collapse : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री पूल कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला.
चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री पूल कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर चीनमधील शानक्सी प्रांतात शुक्रवारी रात्री ८.४० च्या सुमारास पूल कोसळला. शनिवारी सकाळपर्यंत बचावकार्यात पाच वाहनं बाहेर काढण्यात आली होती. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.
अधिकारी सध्या बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. उत्तर आणि मध्य चीनच्या मोठ्या भागात मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे पूर आणि बरेच नुकसान झालं. उत्तर चीनमध्ये मुसळधार पावसानंतर पूल कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला.
🚨#BREAKING: Highway bridge partially collapses in northwest China, killing over ten people.
— R A W S G L 🌎 B A L (@RawsGlobal) July 20, 2024
📌#ShangluoCity | #China
At least eleven people were killed after a highway bridge partially collapsed in Shangluo City located in Zhashui County in northwest China's Shaanxi Province,… pic.twitter.com/dL0Q4g09jH
शिन्हुआच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळपासून बचावकार्य सुरूच होते, ज्यामध्ये आतापर्यंत पाच वाहनं पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहेत. सरकारी टेलिव्हिजनवरील फोटोमध्ये पुलाचा अर्धा भाग कोसळलेला दिसत आहे आणि त्यावरून नदी वाहत आहे.
शुक्रवारी, सरकारी मीडियाने वृत्त दिलं की शानक्सीच्या बाओजी शहरात पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे किमान पाच लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण बेपत्ता आहेत. मंगळवारपासून उत्तर आणि मध्य चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे पूरस्थिती आणि खूप नुकसान झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.