VIDEO: तलावात बोटिंग करताना अंगावर पडला हजारो टन वजनी खडक; 7 जणांचा मृत्यू तर 20 बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 03:39 PM2022-01-09T15:39:59+5:302022-01-09T15:40:48+5:30
ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात शनिवारी ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.
रिओ दि जेनेरो:ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. तलावात बोटिंग करणाऱ्या पर्यटकांवर भला मोठा मोठा खडक पडला. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 32 जण जखमी झाले. याशिवाय 20 जण बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
मिनास गेराइस अग्निशमन दलाचे कमांडर कर्नल एडगार्ड एस्टेवो डी सिल्वा यांनी या घटनेची माहिती दिली आहे. एस्टेवो डी सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 7 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर 32 लोक जखमी झाले आहेत. 20 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात फर्नेस तलावावर लोक बोटीवरुन जात असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान दगडाचा मोठा भाग तुटून बोटींवर पडला.
Terrible video out of Lake Furnas, #Brazil, captures the moment a canyon cliff collapses on boats full of tourists. Latest reports say at least 5 dead 20 missing.pic.twitter.com/03LrGX0kIL
— Albert Solé (@asolepascual) January 8, 2022
पावसामुळे झाला अपघात
मिनास गेराइसचे गव्हर्नर रोमू झेमा यांच्या म्हणण्यानुसार, कॅपिटोलियोमधील फर्नास तलावातील खडकाचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. जेम्मा यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आम्ही लोकांना आवश्यक संरक्षण आणि मदत देण्यासाठी काम करत राहू. बेपत्ता लोकांचा शोध सुरूच राहील. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, नौदलाने शोध आणि बचाव कार्यासाठी टीम तैनात केली आहे.