चिनी सैरभैर! कोरोना पुन्हा वाढताच माणसांसह मासे व खेकड्यांची करतायेत RT-PCR चाचणी, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 01:34 PM2022-08-20T13:34:36+5:302022-08-20T13:41:03+5:30
COVID Cases Rise in China: Fish And Crabs Also Undergo RT-PCR Test - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र दिसत आहे.
COVID Cases Rise in China: Fish And Crabs Also Undergo RT-PCR Test - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची तयारी सुरू झाली आहे आणि RT-PCR चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना RT-PCR चाचणी करण्याचे आदेश दिले गेले आहे, तर दुसरीकडे समुद्रातील जीवांचीही चाचणी चिनच्या Xiamen येथे केली जात असल्याचे समोर आले आहे.
मासे, खेकडे आदींची RT-PCR चाचणी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल झाले आहेत. यात PPE किट्स घातलेले आरोग्य सेवक मास्याच्या तोंडातू व खेकड्याच्या कवचातून स्वॅब्सचे नमूने घेत असल्याचे दिसत आहेत.
With the coronavirus cases on the rise in China again, the local authorities in China's Xiamen region have started RT-PCR testing not only the citizens but also its live seafood, such as fish and crabs, for the virus. pic.twitter.com/ATOOgS8KM8
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 20, 2022
आरोग्य सेवकाकडून समुद्रीजीवांच्या या RT-PCR चाचणीच्या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यू मिळालेले आहेत आणि तेवढेच शेअरही मिळाले आहेत. काही नेटिझन्स आरोग्य सेवकांचे समर्थन करताना दिसत आहेत, तर काही विरोधही करत आहेत.
Videos of pandemic medical workers giving live seafood PCR tests have gone viral on Chinese social media. pic.twitter.com/C7IJYE7Ses— South China Morning Post (@SCMPNews) August 18, 2022
चीनमध्ये ५-६ ऑगस्टला एका दिवसाला १६-१७ हजार कोरोना रुग्ण सापडल्याने पुन्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सध्याच्या घडीला चीनमधील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ८२४३ इतकी आहे.