VIDEO - साप घुसल्याने प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2016 01:27 PM2016-11-08T13:27:13+5:302016-11-08T13:47:49+5:30

रस्ते, रेल्वे प्रवासाच्या तुलनेत हवाई प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित समजला जातो. पण विमानामध्ये प्रवाशांना या उलट अनुभव आला.

VIDEO - Emergency landing of migratory aircraft due to snake jump | VIDEO - साप घुसल्याने प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडीग

VIDEO - साप घुसल्याने प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडीग

Next

 ऑनलाइन लोकमत 

लिऑ, दि. ८ - रस्ते, रेल्वे प्रवासाच्या तुलनेत हवाई प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित समजला जातो. पण एरो मेक्सिकोच्या विमानामध्ये प्रवाशांना या उलट अनुभव आला. विमान उड्डाणवस्थेत असताना अचानक वरच्या बाजूने साप बाहेर आल्याने विमानातील प्रवाशांची पाचावर धारण बसली. 
 
समोर साप दिसताच प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. हे विमान मेक्सिको सिटीमध्ये लँड होणार होते. पण त्याआधीच जवळच्या विमानतळावर विमानाचे लँडीग करण्यात आले. त्यानंतर विमानात लगेच प्राणी मित्राला पाचारण करुन सापाला बंदिस्त करण्यात आले. 
 
मेक्सिकोमध्ये रविवारी ही घटना घडली. विमानात साप आलाच कसा याची चौकशी सुरु झाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबदारी घेऊ असे एरो मेक्सिकोने सांगितले. 
 


Web Title: VIDEO - Emergency landing of migratory aircraft due to snake jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.