व्हिडिओ - युरो चषक : इंग्लंड-रशिया सामन्यांनतर समर्थकांमध्ये हाणामारी
By admin | Published: June 12, 2016 08:48 AM2016-06-12T08:48:44+5:302016-06-12T09:38:31+5:30
यूरो चषकामधील इंग्लंड आणि रशिया यांच्यामधील सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. फुटबॉल वर्ल्डकपनंतर सर्वात लोकप्रिय स्पर्धा अर्थात यूरो कपला सुरूवात झाली
Next
ऑनलाइन लोमकत
पॅरिस, दि. १२ : यूरो चषकामधील इंग्लंड आणि रशिया यांच्यामधील सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. फुटबॉल वर्ल्डकपनंतर सर्वात लोकप्रिय स्पर्धा अर्थात यूरो कपला सुरूवात झाली असुन चांगलीच रंगत पहायला मिळत आहे. प्रेषकांचा उस्ताह शिगेला पोहचला आहे. युरो चषकातील ग्रुप बी मधील इंग्लंड आणि रशिया यांच्यातील सामना रंगतदार होणार याची सर्वांनाच अपेक्षा होती. त्याचप्रमाणे हा सामना रंगतदार झाला आणि सामन्यात दोन्ही संघाने १-१ गोल केला त्यामुळे सामना अनिर्णीत सुटला.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅचनंतर काही रशियन समर्थक आणि इंग्लंड समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर मारहाण आणि तोडफोडही झाली आहे. या घटनेत सुमारे १९ जण जखमी झाले आहेत तर एकाची परिस्थिती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा वापर केला.
फ्रान्समध्ये होत असलेल्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युरोप फुटबॉलमय झालं आहे. ही स्पर्धा ११ जून ते ११ जुलै या कालावधीत रंगणार आहे.
Mail on Sunday Sport:
— Nick Sutton (@suttonnick) June 11, 2016
Back in the dark ages?#tomorrowspaperstoday#bbcpapers#euro2016pic.twitter.com/dpzJSkPVKp
Russians piling into English fans here. English literally fleeing the stadium. No police anywhere #ENGRUSpic.twitter.com/HrLqY6BRZS
— ian herbert (@ianherbs) June 11, 2016