इस्रायली दूतावासाबाहेर गोळीबार, आरडा-ओरड करत लोकांची पळापळ; परिसरात दशहत - बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:06 PM2024-09-05T16:06:20+5:302024-09-05T16:09:53+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकार्याने संशयितावर गोळी झाडली असून तो जखमी झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.
जर्मनीतील म्युनिक शहरात असलेल्या इस्रायली दूतावासाबाहेर एका शूटरने जबरदस्त गोळीबार केला. या गेळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. यात, एक व्यक्ती धावताना दिसत आहे. तसेच गोलीबाराचा आवाजही येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकार्याने संशयितावर गोळी झाडली असून तो जखमी झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.
म्युनिक पोलिसांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, सध्या ब्रिएनरस्ट्रॅस आणि कॅरोलिनप्लात्झ भागात एक मोठे ऑपरेशन सुरू आहे. आमच्याकडे बरेच आपत्कालीन कर्मचारी आहेत. आम्ही आपल्याला विनंती करतो की, या भागापासून शक्य तेवढे दूर राहावे. या भागावर हेलिकॉप्टरच्या माध्यमानेही लक्ष ठेवले जात आहे.
इस्रायली माध्यमांनी गुरुवारी दिलेल्या माहिती नुसार, म्युनिक येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडली. बव्हेरियाची राजधानी असलल्या म्युनिक येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ वारंवार गोळीबाराचा आवाज आला. यानंतर घटनास्थळी पोलीस दलाला पाचारण करण्यात आले.
Shots fired outside Israeli 🇮🇱 consulate in Munich #München, Germany 🇩🇪 https://t.co/qetzHEz8APpic.twitter.com/WQTqjif0m6
— Saad Abedine (@SaadAbedine) September 5, 2024
कुणालाही इजा नाही -
परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाने म्हटले आहे की, वाणिज्य दूतावासातील कुणालाही इजा झालेली नाही. हल्लेखोराला सुरक्षा दलांनी पकडले आहे. जेरुसलेम पोस्टनुसार, 52 वर्षांपूर्वी म्युनिकमध्ये असाच हल्ला झाला होता. इस्रायलच्या ऑलिम्पिक खेळाडूंची पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ गुरुवारी वाणिज्य दूतावास बंद ठेवण्यात आला होता.