Video: मालदीवच्या संसदेत फुल ऑन राडा! मोईज्जुंच्या समर्थकांची मतदानात बाधा, एवढे कशाला घाबरले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 07:54 PM2024-01-28T19:54:32+5:302024-01-28T19:55:10+5:30
डिसेंबरमध्ये मालदीवमध्ये मंत्री निवडले जाणार होते. परंतु, विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी मोईज्जू यांच्या सदस्यांना मंत्री होण्यापासून रोखले होते.
मालदीवमध्ये चिनी समर्थकांची सत्ता आली आहे. यामुळे मालदीवने भारताविरोधात पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी मतदान होणार होते, परंतु विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने सत्ताधाऱ्यांनी मतदान न होण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. याचा परिणाम मालदीवच्या संसदेत हाणामारी झाली आहे.
डिसेंबरमध्ये मालदीवमध्ये मंत्री निवडले जाणार होते. परंतु, विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी मोईज्जू यांच्या सदस्यांना मंत्री होण्यापासून रोखले होते. तेव्हापासून मालदीवमध्ये सत्ताधारी मोईज्जू सरकार मतदान पुढे ढकलत आहे. आज विरोधी पक्ष एमडीपीने चार मंत्र्यांची मंजुरी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे विरोधकांसाठी संसदेचे दरवाजे देखील बंद करण्यात आले होते.
यानंतर आत घुसलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. परंतु त्याला सत्ताधारी आघाडी पीपीएम आणि पीएनसीच्या खासदारांनी विरोध केला. संसदेत त्यांचे बहुमत नसल्याने सत्ताधाऱ्यांना मतदान होऊ द्यायचे नाहीय. बहुमत नसतानाही मोईज्जू राष्ट्रपती कसे बनले असा प्रश्न पडला असेल, त्याचे उत्तर आहे भारत आणि तेथील निवड प्रक्रिया वेगवेगळी आहे.
Elect a Clown @MMuizzu , expect a Circus.
— BALA (@erbmjha) January 28, 2024
Kalesh inside Maldives Parliament. Ruling party members preventing the speaker from continuing the session amid vote on the approval of Muizzu's Cabinet 😂 pic.twitter.com/i89VUgBP6I
मालदीवची निवडणूक व्यवस्था वेगळी...
मालदीवच्या संसदेला पीपल्स मजलिस म्हणतात. मालदीवमध्ये राष्ट्रपती आणि खासदारांची निवडणूक वेगवेगळी असते. गेल्या वर्षी मालदीवच्या राष्ट्रवतीपदासाठी निवडणूक झाली होती, तर खासदारांची निवडणूक ही २०१९ मध्ये झाली होती. यामुळे मोईज्जू राष्ट्रपती पदासाठी निवडून आले तर खासदार विरोधी पक्षाचे जास्त आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळणारा उमेदवार राष्ट्रपती बनतो. आता खासदारांसाठी 17 मार्च 2024 ला निवडणूक होणार आहे.