चीनमधून समोर आला धक्कादायक Video; रहस्यमयी आजाराने त्रस्त चिमुकल्यांसाठी 'होमवर्क झोन'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:06 PM2023-11-30T14:06:36+5:302023-11-30T14:07:16+5:30

चीनमध्ये फुफ्फुसासंबंधित एक रहस्यमयी आजार वेगाने पसरत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Video homework zones set up in china hospitals for ailing kids in pneumonia outbreakVideo | चीनमधून समोर आला धक्कादायक Video; रहस्यमयी आजाराने त्रस्त चिमुकल्यांसाठी 'होमवर्क झोन'

चीनमधून समोर आला धक्कादायक Video; रहस्यमयी आजाराने त्रस्त चिमुकल्यांसाठी 'होमवर्क झोन'

चीनमध्ये फुफ्फुसासंबंधित एक रहस्यमयी आजार वेगाने पसरत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयांमध्ये लोकांची गर्दी असते. रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलं आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या अभ्यासाचं कोणतंही नुकसान पोहोचू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी 'होमवर्क झोन' तयार करण्यात आले आहेत. हे चीनच्या उत्तर भागात असलेल्या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आले. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आजारपणातही मुलांना अतिरिक्त ताण दिला जात असल्याचं या उपक्रमाला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये लहान मुलांना सलाईन लावल्याचं पाहायला मिळत आहे. तरी ते अभ्यास करत आहेत. इतर भागातही हे दिसून येत आहे. ज्यामध्ये मध्य हुबेई प्रांत तसेच पूर्व जिआंगसू आणि अनहुई प्रांतांचा समावेश आहे.


होमवर्क झोनमध्ये मुलांसाठी टेबल, खुर्च्या आणि ड्रिपची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून उपचारासोबतच त्यांचे शिक्षणही सुरू राहील. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं जात आहे की, पालक मुलांना पूर्ण पाठिंबा देत आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना एका पालकाने हॉस्पिटलमधील अभ्यासाच्या सकारात्मक वातावरणाबद्दल आनंद व्यक्त केला. माझ्या मुलाला इथे गृहपाठ करू देण्याचा माझा हेतू नव्हता. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये अभ्यासाचे वातावरण पाहिले तेव्हा मला ते चांगले वाटले. म्हणूनच मी माझ्या मुलालाही गृहपाठ करायला सांगितलं असं म्हटलं आहे.

आणखी एका मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, त्याच्या मुलाने रुग्णालयात त्याचा गृहपाठ पूर्ण केला पाहिजे जेणेकरून तो बरा झाल्यानंतर शाळेत परतल्यावर अभ्यासात मागे पडू नये. मात्र, प्रत्येकजण या उपक्रमाला पाठिंबा देत नाही. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर एका युजरने ही मुलं शारीरीक आणि मानसिकरित्या खूप आजारी आहेत.'


 

Web Title: Video homework zones set up in china hospitals for ailing kids in pneumonia outbreakVideo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन