Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 07:10 PM2023-11-23T19:10:43+5:302023-11-23T19:11:25+5:30
Video of Tunnel in Shifa Hospital: गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाखाली हमासचा सर्वात मोठा बोगदा आढळला आहे.
Israel Hamas War Updates: इस्रायल आणि हमास युद्धाने भीषण वळणावर आले आहे. दरम्यान, इस्रायलकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, ज्यात हमासने संपूर्ण गाझा पट्टीमध्ये बोगदे बनवल्याचे समोर आले आहे. या बोगद्यांमध्येच हमासचे दहशतवादी लपायचे. इस्रायली लष्कराने गाझामध्ये बांधलेल्या सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाचा ताबा घेतला. यानंतर त्यांना हॉस्पिटलच्या खाली सर्वात लांब बोगदा सापडला. हा बोगदा हॉस्पिटलपासून शहराच्या आत जातो.
Al-Shifa Hospital from above
— Israel Defense Forces (@IDF) November 22, 2023
Hamas terror complex below
Hamas hides behind hospitals
And here’s the drone footage
That incontrovertibly proves it
Hamas wages war from hospitals
Will the world condemn Hamas? pic.twitter.com/xvvqErP0t1
इस्रायली लष्कराने गुरुवारी गाझामधील सर्वात मोठ्या बोगद्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केले. इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की हा बोगदा एका विशाल भूमिगत नेटवर्कचा भाग होता, ज्याचा वापर हमासकडून लष्करी हेतूने केला जायचा. अल-शिफा हॉस्पिटलचा वापर हमासकडून शस्त्रे आणि कमांड सेंटर लपवण्यासाठी केला जात होता. इस्रायलने पलटवार केल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा अपप्रचार केला, अशी माहिती इस्रायली अधिकार्यांनी दिली.
Yes, we have discovered yet another Hamas tunnel, however this time beneath a civilian house near Shifa Hospital. pic.twitter.com/PbDEZQgU8R
— Israel Defense Forces (@IDF) November 23, 2023
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये इस्रायली सैनिक अल-शिफा हॉस्पिटलजवळील एक बोगदा दाखवतात. या बोगद्याच्या आत एक स्नानगृह, एक स्वयंपाकघर आणि एक वातानुकूलित खोली सापडली. या बोगद्यात शिरण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेरील मैदानात एक रस्ता तयार करण्यात आला होता. यातूनच हमासचे दहशतवादी आत शिरायचे आणि बोगद्यात गायब व्हायचे. इस्रायली सैन्याने काही पत्रकारांनाही या बोगद्यात जाऊन पाहणी करू दिली. लष्कराने बोगद्यातून मोठ्या प्रमाणात बंदुका, दारूगोळा आणि इतर स्फोटकेही जप्त केली.