इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट

By admin | Published: January 27, 2016 02:51 PM2016-01-27T14:51:23+5:302016-01-27T14:54:15+5:30

इजिप्तमधल्या क्रांतीला पाच वर्षे पूर्ण झाली असून त्यानंतर आलेल्या राजवटीची थट्टा करण्यासाठी एक पत्रकार व एक कलाकार या दोघांनी काँडमचे फुगे तयार केले व ते पोलीसांना भेट दिले

A video of a huge visit to Egyptian police hit the hit | इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट

इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट

Next
ऑनलाइन लोकमत
कैरो (इजिप्त), दि. २७ - इजिप्तमधल्या क्रांतीला पाच वर्षे पूर्ण झाली असून त्यानंतर आलेल्या राजवटीची थट्टा करण्यासाठी एक पत्रकार व एक कलाकार या दोघांनी काँडमचे फुगे तयार केले व ते पोलीसांना भेट दिले. सोमवारी हा अनपेक्षित प्रकार या दोघांनी नुसता केला नाही, तर त्याचे चित्रीकरण करून ते फेसबुकवर अपलोड केले. हा हा म्हणता, हा व्हिडीयो व्हायरल झाला असून आत्तापर्यंत तो १५ लाखांच्यावर नेटिझस्नही बघितला आणि त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही आल्या. परंतु, ही गंमत या दोघांच्या अंगाशी येऊ शकते, त्यांना अटकही होऊ शकते.
सोमवारी इजिप्तमध्ये राष्ट्रीय पोलीस दिन साजरा करण्यात आला. होस्नी मुबारक यांच्या राजवटीविरोधात उठाव झाला आणि ती राजवट हटवली गेली. पोलीसांच्या क्रूर वागणुकीविरोधातही हा उठाव होता. या व्हिडीयोचे चित्रीकरणही प्रसिद्ध ताहरीर स्क्वेअर येथे झाले, जेथून मूळ उठाव झाला होता. विद्यमान अध्यक्ष अब्देल सिसींचे मोजके समर्थक वगळता ताहरीर स्क्वेअर सोमवारी रिकामा होता. 
या ठिकाणी अहमद मलेक हा कलाकार व पत्रकार शेडी हुसेन या दोघांनी मिळून ही काँडमची गंमत केली आणि पोलीसांविरोधात अद्याप असलेली नाराजी या मार्गाने व्यक्त केली. सिसींच्या पाठिराख्यांची खिल्ली उडवताना या दोघांनी लाँग लिव्ह इजिप्तच्या घोषणा देत मातृभूमीचं चुंबन घेतलं व राष्ट्रध्वज फडकावला.
बाकी सगळं ठीक असलं तरी या कृत्यातून त्यांनी पोलीसांचा अपमान केला असल्याची तक्रार झाली आहे. जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना जवळपास १२०० डॉलर्स इतका दंड व सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 
 

हुसेन याने फेसबुकच्या पोस्टमध्ये आम्ही तर फक्त गंमत करत होतो असं म्हटलंय. परंतु त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली असून आता पोलीस व सरकार हे किती गंभीरपणे घेतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मलेक याचं कला सादर करण्याचा परवाना रद्द करण्यात आल्याचंही वृत्त आहे. 
मलेक यानं याप्रकरणी मापी मागितली असून, मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यामुळे कदाचित आमच्या हातून असं घडलं असावं असं म्हटलं आहे. अर्थात, माझं मत व्यक्त करताना इतरांच्या अधिकारावर मी घाला घालता कामा नये असंही त्यानं प्रांजळपणे कबूल केलं आहे.
पोलीसांसह कुणाचीही मी भावना दुखावली असेल तर माफ करा असा माफीनामाही मलेकनं व्यक्त केला आहे. 
पोलीसांच्या बाजुने असलेल्या एका अनधिकृत फेसबुक पेजवर मार्मिक प्रतिक्रिया आली आहे. या दोघांना उद्देशून असं म्हटलंय की, अभिनंदन तुम्ही ३७,००० अधिका-यांना आपले शत्रू बवनून बसलेले आहात.

Web Title: A video of a huge visit to Egyptian police hit the hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.