VIDEO- आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच लाँच
By admin | Published: September 7, 2016 10:58 PM2016-09-07T22:58:18+5:302016-09-07T23:18:44+5:30
आयफोन 7 सोबतच अॅपल आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच 2 या दोन फोनचं लाँचिंग झालं आहे.
ऑनलाइन लोकमत
सन फ्रान्सिस्को, दि. 7 - अॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 7 आज लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अॅपलच्या आयफोन 7 संदर्भातील अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर आयफोन 7चा व्हिडीओही जबरदस्त व्हायरल होऊन लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अॅपलचा हा आयफोन 7 म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवी क्रांती असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आयफोन 7 सोबतच अॅपल आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच 2 या दोन फोनचं लाँचिंग झालं आहे. मात्र सर्व फोनपैकी अॅपल 7 या फोन लोकांच्या केंद्रस्थानी आहे.
आयफोन 7ची स्क्रीन साईज 4.7 इंच, तर आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच 2 हँडसेटची स्क्रीन 5.5 इंच आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही आयफोन थ्रीडी टच आहेत. या हँडसेट्सच्या 32 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 53 हजार रुपये आहे. तर 64 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 61 हजार रुपये आणि 256 जीबीच्या आयफोनची किंमत 71 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याचसोबत 32 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 61 हजार रुपये, 128 जीबीच्या आयफोन 7 प्लसची 69 हजार आणि 256 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 79 हजार रुपयांच्या जवळपास आहे. अॅपल कंपनीच्या या तिन्ही आगामी हँडसेट्समध्ये ए10 प्रोसेसरसोबत बसवण्यात आले आहेत.
आयफोन 7 मध्ये 2 जीबी रॅम, आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच 2मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. अॅपल प्लस आणि अॅपल वॉच 2 मध्ये एकाच प्रकारचे सीपीयूचा वापर केला असून, क्लॉक स्पीडही आधीच्या आयफोनपेक्षा अधिक आहे. अॅपलचे हे सर्व आयफोन वॉटर रेसिस्टंट आहेत. तर आयफोनमध्ये स्टिरीओ स्पीकरही उत्तम प्रतीचे देण्यात आले आहेत. या सर्व आयफोनमध्ये हेडफोन जॅकच्या त्याऐवजी नवीन लाइटनिंग पोर्ट देण्यात आलं आहे. त्याद्वारेच एअरफोन कनेक्ट होणार आहे. हे सर्व फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येणार आहेत.
आयफोन 7ची वैशिष्ट्ये
आयफोन 7ला 4.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच आयफोन 7मध्ये हेडफोन जॅकची सुविधा देण्यात आली नसून वायरलेस हेडफोननेच आयफोन 7 कनेक्ट होणार आहे. आयफोन 7मध्ये सुधारित 12 मेगा पिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला असून, कमी प्रकाशातही चांगली स्पष्टता देणार आहे. यात ड्युएल लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयफोन 7मध्ये सर्वाधिक जलद चालणारी नवीन ए10 चिफ बसवण्यात आली असून, 3 जीबीचा रॅम देण्यात आला आहे. तसेच 2.37GHZ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं सेन्सिटीव्ही होम बटण देण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोन ऑपरेटिंग करताना सुपरफास्ट चालणार आहे. या आयफोन 16 जीबीची किंमत 43 हजारांच्या घरात आहे. तर 32 जीबीच्या आयफोन 7ची किंमत 53 हजारांपर्यंत असणार आहे.
सॅमसंगनं गॅलक्सी 7चे स्मार्टफोन फोन मागवले परत
सॅमसंगनं जवळपास 2.5 मिलियन म्हणजेच 25 लाखांच्या घरात गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोन परत मागवले आहेत. गॅलक्सी 7च्या अधिकतर स्मार्टफोनमध्ये सदोष बॅटरी असल्यानं स्फोट होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर सॅमसंग कंपनीनं गॅलक्सी 7चे फोन परत मागवले आहेत. मात्र त्याच वेळी अॅपलनं आयफोन 7 लाँच केल्यानं सॅमसंगला हा जबरदस्त धक्का मानला जात आहे.