Video : भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत बंदुकधारी तालिबानी; सभापतींच्या खुर्चीवरही बसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:47 PM2021-08-16T20:47:13+5:302021-08-16T20:49:32+5:30

Afghanistan Taliban Crisis : बंदुकधारी तालिबानींनी केला भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश. सभापतींच्या खुर्चींवरही बसले. 

Video kabul afghanistan Taliban gunmen in Afghan parliament set up by India also sat on the chair of speaker | Video : भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत बंदुकधारी तालिबानी; सभापतींच्या खुर्चीवरही बसले

Video : भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत बंदुकधारी तालिबानी; सभापतींच्या खुर्चीवरही बसले

googlenewsNext
ठळक मुद्देबंदुकधारी तालिबानींनी केला भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश. सभापतींच्या खुर्चींवरही बसले. 

रविवारी तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे कब्जा केल्यानंतर देशाची संपूर्ण सूत्रं तालिबानच्या हाती जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. याचदरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये काय परिस्थिती असू शकेल आणि तालिबान देश कशाप्रकारे चालवू शकतो याची झलक नुकतीच दिसली. संसद ही लोकशाहीसाठी पवित्र मानली जाते. परंतु राष्ट्राध्यक्ष भवनानंतर आता तालिबानींनी अफगाणिस्तानच्या संसदेवरही कब्जा केला. तालिबानींनी हत्यारांसह संसदेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर सभापतींच्या खुर्चीवरही ते बसले. या संसदेची उभारणी भारतानं केली होती. तसंच २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ससंद भवनाचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. 

वजाहत काझमी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काही बंदुकधारी तालिबानी अफगाणिस्तानच्या संसदेच्या आत फिरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यापैकी एक बंदुकीसह सभापतींच्या खुर्चीवरही बसताना दिसत आहे. त्यांच्या समोर असलेल्या खुर्च्यांवरही काही तालिबानी बसल्याचं दिसून येत आहे. 


अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहेत. 

गनी यांची भावूक पोस्ट
"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं होतं.

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं
"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.

Web Title: Video kabul afghanistan Taliban gunmen in Afghan parliament set up by India also sat on the chair of speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.