Video : गोंधळलेला प्रवासी.... विमानतळावरील X-ray स्कॅनरमध्ये बॅगसह चक्क तोही शिरला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 09:16 AM2019-04-12T09:16:43+5:302019-04-12T09:18:04+5:30
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तर, जगभरातील लोकांच्या तऱ्हा व्हायरल करण्यात सोशल मीडिया आघाडीवर असतो.
सध्या सोशल मीडियावर एका रशियन प्रवाशाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये हा प्रवासी विमातळावर बसविण्यात आलेल्या बॅगेज स्कॅनरमध्ये घुसल्याचे दिसून येते. हातात बॅग घेतलेला हा प्रवासी चक्क बॅगेसहित प्रवासी बॅग चेकिंग स्कॅनरमध्ये शिरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्या स्कॅनरमधून तो बाहेरही आल्याचे दिसते. त्याला, पाहून तेथील सुरक्षा अधिकारीही आश्चर्यचकित झाला आहे.
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तर, जगभरातील लोकांच्या तऱ्हा व्हायरल करण्यात सोशल मीडिया आघाडीवर असतो. आता, आपली प्रवासी बॅग घेऊन एक प्रवासी विमानतळावरील स्कॅनरमधून चक्क बॅगे घेऊनच बाहेर आल्याचं दिसून येत आहे. काळा जॅकेट आणि काळा ट्राऊजर घातलेला हा रशियन प्रवासी विमातळावरील सुरक्षा सुरक्षा पोस्टजवळ आला. मात्र, आपली चूक होत आहे, हे लक्षात येताच बाजुला असलेल्या स्कॅनरमध्ये बॅग चेकिंगसाठी टाकण्यास तो गेला. पण, चेकिंग स्कॅनर मोठा दिसल्याने तो चक्क बॅग घेऊनच त्या स्कॅनरमधून बाहेर पडला. त्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने त्याचा हा आडमूठपणा पाहून आश्चर्य व्यक्त केले. तसेच, माणसाने येथून यायचे असून तिथे फक्त लगेज चेक करायचं असतं, असंच काहीतरी त्यानं या प्रवाशाला सांगितलं असाव. कारण, सुरक्षा अधिकारी त्या प्रवाशाला घेऊन सेक्युरिटी चेकपोस्टकडे नेऊन काहीतरी बोलत असल्याचे व्हीडीओत दिसून येत आहे. सर्वप्रथम RT न्यूजने हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवर हा व्हीडीओ जोमाने व्हायरल होत आहे. विमानतळावरील या प्रवाशाच्या अशा वागण्यामुळे कुणीतरी यांना आवरा रे... असंच म्हणावं लागेल.
दरम्यान, यापूर्वीही दक्षिण चायनातील एका महिलेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, महिलेची बॅग स्कॅनर मशिनमध्ये अडकली होती. त्यानंतर, महिलेने आपली बॅग मिळवण्यासाठी चक्क गुडग्यावर टेकून स्कॅनर मशिनमधून बाहेर पडताना दिसत होती. स्कॅनरमधील त्या महिलेचे फोटो आणि व्हीडिओही व्हायरल झाला होता.
पाहा व्हीडिओ -