Video: भारतीय पाणबुडीला समुद्रात घुसखोरी करताना रोखले; पाकिस्तानी नेव्हीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:31 PM2021-10-19T15:31:48+5:302021-10-19T15:35:09+5:30
Pakistan Navy Prevented Indian Submarine: पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप करताना ही अशाप्रकारची तिसरी घटना आहे, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या टेहळणी विमानाने भारतीय पाणबुडीला पाकिस्तानी समुद्रात पाहिले. पाकिस्तानी नौदलाने या घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे.
कराची : भारताची पाणबुडी (Indian Submarine) पाकिस्तान समुद्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होती, असा खळबळजनक दावा पाकिस्तान नौदलाने (Pakistan Navy) केला आहे. पाकिस्तानी नौदलाने याचा व्हिडीओ जारी केला असून अरबी समुद्रातील 16 ऑक्टोबरची ही घटना असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप करताना ही अशाप्रकारची तिसरी घटना आहे, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या टेहळणी विमानाने भारतीय पाणबुडीला पाकिस्तानी समुद्रात पाहिले. पाकिस्तानी नौदलाने या घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये एक पाणबुडी दिसत आहे. परंतू ही पाणबुडी भारताचीच होती की आणखी कोणाची ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान असे दावे करत असतो. भारतीय नौदलाने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तान नौदलाने म्हटले की ते सतत समुद्रावर लक्ष ठेवून आहेत. या दरम्यान ही पाणबुडी दिसली आहे.
मार्च 2019 मध्ये देखील पाकिस्तानने भारतीय पाणबुडी अरबी समुद्रात पकडल्याचा दावा केला आहे. ही पाणबुडी पाकिस्तानी समुद्रात होती. या पाणबुडीला आम्ही आरामात नष्ट करू शकत होतो, मात्र शांततेची संधी म्हणून सोडून दिल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. तसेच भारतीय पाणबुडीवर नजर ठेवल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
Indian submarine prevented from entering Pakistan's waters by the Pakistan Navy. #Pakistan#Navy#India#PakvsIndpic.twitter.com/TrzaZnNLcg
— Hamza Azhar Salam (@HamzaAzhrSalam) October 19, 2021
भारताला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान नौदल स्वप्ने पाहत आहे. परंतू पाकिस्तानी नौदलाची हालत आधीपासूनच खराब आहे. पाकिस्तानच्या दोनच पाणबुड्या सक्रीय आहेत. तीन ऑगस्टा क्लास पाणबुड्या अपग्रेड करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत किंवा त्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. ऑगस्टा 70 क्लासची पाणबुडी पीएनएस हुरमतच्या इंजिनामध्ये बिघाड आहे. इलेक्ट्रानिक वॉरफेयर सपोर्ट सिस्टिममध्ये समस्या आहे. यामुळे ही पाणबुडीदेखील काम करण्याच्या स्थितीत नाही.