Video: 'सायकवरून गस्त घालताहेत पाकिस्तानचे पोलीस अन् सरकार भारताला देतंय युद्धाची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 05:23 PM2019-08-29T17:23:40+5:302019-08-29T17:25:35+5:30
भारत सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान सैरभैर झालेला आहे. तसेच काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकीही देत आहे. मात्र...
इस्लामाबाद - भारत सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान सैरभैर झालेला आहे. तसेच काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानभारताला युद्धाची धमकीही देत आहे. मात्र भारताला सतत युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर खालावली असून, खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाला वीज बिल थकवल्याने नोटीस पाठवण्यात आलेली आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तानमधील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा पोलीस चक्क सायकलवरून गस्तीवर निघालेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पत्रकार, लेखक आणि बलूच नेता तारिक फतेह यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक पोलीस रात्रीच्या वेळी सायकलवरून गस्त घालत आहे. तसेच या सायकलवर पोलिसांच्या दुचाकी किंवा जिप्सीवर असतात त्याप्रमाणे लाल निळी लाईट आणि सायरनही दिसत आहे. मात्र हा पोलीस कर्मचारी नेमका कुठे गस्त घालत आहे. तसेच हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
Pakistani cops on economy drive! pic.twitter.com/brwgvl0u1e
— Tarek Fatah (@TarekFatah) August 29, 2019
दरम्यान, तारिक फतेह यांनी या पाकिस्तानी पोलिसाच्या व्हिडीओवर विनोदी टिप्पणी केली आहे.'पाकिस्तानी कॉप्स ऑन इकॉनॉमी ड्राइव्ह' म्हणजेच खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे या पोलिसावर अशी गस्त घालण्याची वेळ आली आहे, असा टोला फतेह यांनी लगावला. दरम्यान, तारिक फतेह यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.