Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 09:42 AM2020-08-03T09:42:50+5:302020-08-03T13:11:02+5:30
पाकिस्तानमधील प्रसिद्ध डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी तिरंगा फडकला आणि स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देण्यात आल्या.
इस्लामाबाद - पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक भारताचा झेंडा फडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी तिरंगा फडकला आणि स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देण्यात आल्या. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलवर भारताचा झेंडा फडकल्यानंतर चॅनलची सिस्टम हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनलचं काम हे नेहमीप्रमाणे सुरू होतं. रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास मात्र त्यानंतर अचानक भारताचा झेंडा चॅनलवर फडकला आणि त्यासोबतच त्याखाली स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा (Happy Independence Day) असा मेसेज देखील आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
Dawn news channels of Pakistan hacked by Hackers
— News Jockey (@jockey_news) August 2, 2020
Tri flag on live TV pic.twitter.com/xf4SBvENHj
पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूज चॅनलची सिस्टम हॅक करण्यात आली असून यामागे काही हॅकर्स असू शकतात. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती डॉनने एका निवेदनातून जारी केली आहे. चॅनलने यासंबंधी एक ट्विट देखील केले आहे. यामध्ये आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे नेमकं कसं झालं याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जशी आम्हाला याबाबत काही माहिती मिळेल आम्ही त्याबाबत प्रेक्षकांना कळवू असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर
CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अॅपबद्दल बरंच काही...
Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात