VIDEO- पॅरासिलिंग बेतलं जीवावर, 230 फुटांवरून पडून वृद्धाचा मृत्यू

By admin | Published: July 14, 2017 04:06 PM2017-07-14T16:06:47+5:302017-07-14T16:09:35+5:30

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

VIDEO-PARASILLING BEATLAN, descending 230 feet, aged death | VIDEO- पॅरासिलिंग बेतलं जीवावर, 230 फुटांवरून पडून वृद्धाचा मृत्यू

VIDEO- पॅरासिलिंग बेतलं जीवावर, 230 फुटांवरून पडून वृद्धाचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

फुकेट, दि. 14- थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. थायलंडमधल्या फुकेट या शहरात 71 वर्षीय रॉजर हुसै विसीबली आपल्या पत्नीसह पॅरासिलिंग करण्यासाठी गेले होते. समुद्र किनाऱ्यापासून 70 मीटर    (230 फुट) वर गेल्यावर रॉजर समुद्रात पडले. रॉजर आकाशात झेपावल्यानंतर अवघ्या 18 सेकंदांमध्ये रॉजर समुद्रात कोसळले. त्यानंतर रॉजर यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी पॅरासिलिंग ऑपरेटर आणि बोटीचा ड्रायव्हर या दोघांवर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
आणखी वाचा
 

शाळेत पॉर्न वेबसाईट जॅमर बसवण्याचा केंद्राचा विचार

VIDEO : फ्रान्सच्या फस्ट लेडीच्या फिगरला ट्रम्प म्हणतात...

हा अपघात व्हायचा एक दिवस आधी हुसै त्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांना पॅरासिलिंग करताना पाहत होते. ते पाहूनच हुसै आणि त्यांच्या पत्नीने पॅरासिलिंग करण्याचं ठरवलं होतं. पॅरासिलिंग करणं तेथे सेफ असेल, असं आम्हाला वाटलं होतं. म्हणूनच तेथे गेलो, असं हुसै यांच्या पत्नीने सांगितलं आहे. हुसै उंचावरून समुद्रात पडत असतानाची संपूर्ण घटना त्यांच्या पत्नीने पाहिली आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. पॅरासिलिंगची सुरूवात करताना हसत असलेले हुसै ते समुद्रात कोसळतानाचा क्षण या व्हिडीओत दिसतो आहे. पॅरासिलिंगसारखे पाण्यातील खेळ हे पर्यटन स्थळांवर सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. पण बऱ्याचदा अशा ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना केलेल्या नसतात. 

रॉजर हुसै ऑस्ट्रेलियातील एका इनव्हेस्टमेंट कंपनीमध्ये सीईओ पदावर कार्यरत होते. 

Web Title: VIDEO-PARASILLING BEATLAN, descending 230 feet, aged death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.