Video: कुत्र्याला बाहेर काढण्याची विनंती करणा-या 'ति'लाच पोलिसांनी हाकललं विमानाबाहेर

By सागर सिरसाट | Published: September 28, 2017 03:51 PM2017-09-28T15:51:46+5:302017-09-28T15:57:33+5:30

कुत्र्यांना उतरवावं नाहीतर माझा जीव जाईल अशी विनंती अनिलाने केली... एका महिलेला तुम्ही असा हात लावू शकत नाही असं अनिला ओरडत होत्या. पण त्या पुरूष पोलिसांनी थेट अनिला यांना उचलून विमानाच्या दरवाजाजवळ आणलं.

Video: Police requesting that the dog be pulled out of the plane | Video: कुत्र्याला बाहेर काढण्याची विनंती करणा-या 'ति'लाच पोलिसांनी हाकललं विमानाबाहेर

Video: कुत्र्याला बाहेर काढण्याची विनंती करणा-या 'ति'लाच पोलिसांनी हाकललं विमानाबाहेर

Next

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये एक वेगळाच प्रकार घडलाय. विमानातून प्रवास करताना कुत्र्यांना विमानातून उतरवण्याची विनंती करणा-या एका महिलेलाच विमानातून उतरवण्यात आल्याची घटना घडली आहे. वॉशिंग्टन जवळच्या बाल्टीमोर विमानतळावर ही घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

प्राध्यापक असलेल्या 46 वर्षीय अनिला दौलात्झाई यांच्यासोबत ही घटना घडली आहे. लॉस एंजेलिसला जाण्यासाठी बाल्टीमोर विमानतळावरून साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात त्या बसल्या. पण विमानात बसल्यावर त्यात दोन कुत्रे असल्याचं लक्षात येताच अनिला दौलात्झाई प्रचंड घाबरल्या. कुत्र्यांना पाहिलं तरी हृदयाचा ठोका चुकतो इतक्या त्या कुत्र्याला घाबरतात. त्यामुळे कुत्र्यांना विमानातून उतरवावं नाहीतर माझा जीव जाईल अशी विनंती त्यांनी विमानातील क्रू मेंबर्सना केली. पण कुत्र्यांना विमानातून उतरवू शकत नाही असं म्हणत विमानातील क्रू मेंबर्सनी अनिला दौलात्झाई यांनाच विमानातून उतरण्यास सांगितलं. विमानातून उतरण्यास अनिला यांनी नकार दिला असता सुरक्षारक्षकांना आणि पुरूष पोलिसांना बोलावण्यात आलं. अनिला यांनी त्यांनाही विरोध केला असता त्यांनी अनिला यांना बळजबरीने विमानातून उतरवण्यास सुरूवात केली. अनिला यांना खेचून विमानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश न आल्याने त्या पुरूष पोलिसांनी थेट अनिला यांना उचलून विमानाच्या दरवाजाजवळ आणलं. मला हात लावू नका, एका महिलेला तुम्ही असा हात लावू शकत नाही असं अनिला ओरडत होत्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण पोलिसांनी त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर विमानात असलेल्या इतर प्रवाशांपैकी कोणीही या घटनेचा विरोध केला नाही. इतर महिला प्रवासी देखील केवळ मजा पाहात असल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसतं. आश्चर्य म्हणजे एका महिलेला अशाप्रकारे पुरूष पोलिसांनी उचलण्याच्या या घटनेचं सोशल मीडियावरही काही जणांनी समर्थन केलं आहे. ती महिला चुकीची असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. 

कोण चूक कोण बरोबर यापेक्षाही स्वतःला प्रगत म्हणवणा-या समाजात कुत्र्यांच्या वाटेला आला तितकाही सन्मान या महिलेच्या वाट्याला येवू नये हे कशाचे लक्षण?  

पाहा व्हिडीओ -

Web Title: Video: Police requesting that the dog be pulled out of the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.