व्हिडिओ - पाहा 3D न्यूज बुलेटिन
By Admin | Published: June 16, 2016 01:00 PM2016-06-16T13:00:43+5:302016-06-16T13:00:43+5:30
रशियन टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच थ्रीडी बुलेटिन जारी करण्यात आलं, त्यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन स्वत: स्टुडिओमध्ये हजर होते
>ऑनलाइन लोकमत -
मॉस्को, दि. 16 - तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे. सध्याच्या तरुणांना थ्रीडीचं खूप आकर्षण आहे, आणि त्यामुळेच चित्रपटांपासून ते मोबाईल गेम्सपर्यंत सगळीकडे थ्रीडी टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. मात्र न्यूज चॅनेल्समध्ये ही टेक्नॉलॉजी आत्तापर्यंत वापरण्यात आलेली नव्हती. पण रशियन टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच थ्रीडी बुलेटिन जारी करण्यात आलं.
न्यूज बुलेटीन म्हटलं की अँकर नेहमीप्रमाणे बातम्या सांगणार, रिपोर्टर लाईव्ह, एखादा फोनो हे ठरलेलं असतं.. पण जगामध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही चॅनेलने थ्रीडी बुलेटिन केलं आहे. रशियन टेलिव्हिजनवर हे बुलेटिन दाखवण्यात आलं, त्यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन स्वत: स्टुडिओमध्ये हजर होते.