VIDEO- लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
By admin | Published: June 14, 2017 08:24 AM2017-06-14T08:24:35+5:302017-06-14T10:54:17+5:30
लंडनमधील ग्रेनफेल टॉवर या चोवीस मजल्याच्या इमारतीला भीषण आग लागली आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 14- लंडनमधील ग्रेनफेल टॉवर या 27 मजल्याच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या चोवीस गाड्या आणि 200 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. लंडनमधील ही इमारत आगीने पूर्णपणे वेढली गेली आहे. ही इमारत रहिवासी आहे त्यामुळे इमारतीत अनेक कुटंब अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून सुरू असलेल्या आगीमुळे इमारतीचा एक भाग जळून खाक झाला आहे. तसंच आगीमुळे ही इमारत एका बाजूला झुकली गेली आहे. त्यामुळे ही इमारत कधीही पडू शकते, अशीही माहिती समोर येते आहे. रहिवासी परिसर असल्याने इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
लंडन फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार, सुरूवातील दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. नंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली आहे. स्काय न्यूजने ही संपूर्ण अधिकृत माहिती दिली आहे. "मी स्वयंपाक घरात असताना फायर अलार्म ऐकु आला. बाहेर पाहिल्यावर इमारतीचा उजवा भाग जळताना मला दिसला", अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने स्काय न्यूजला दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पश्मिम लंडनमधील लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट परिसरात ही इमारत आहे.. पोलिसांच्या माहितीनुसार आत्तापर्यत दोन जण जखमी झाले आहेत.
शहर पोलीस सध्या घटनास्थळी हजर आहे. तसंच परिसरातील लोकांना आग लागलेल्या भागापासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. इमारतीतील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून काही जणांना दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिसला रात्री दीड वाजता या संदर्भातील फोन आला होता. त्यानंतर वीस अॅम्ब्युलन्स पुरेशा सुविधांसह घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत. लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिसने ट्विट करून ही माहिती दिली आहे. केंसिंग्टनमधील घटना अत्यंत गंभीर आणि मोठी असल्याची प्रतिक्रिया लंडनचे मेयर सादिक खान यांनी दिली आहे.
द गार्डीयनच्या वृत्तानुसार,"टॉवरमध्ये जवळपास 120 घरं आहेत. घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर धुराचं साम्राज्य पसरलं आहे. फायर ब्रिगेडचे जवान शर्थीचे प्रयत्न करून लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जी लोक अडकली आहेत ते फ्लॅश लाइट चमकवून जवानांना सतर्क करत आहेत, अशी माहिती एका स्थानिक रहिवाश्याने द गार्डीयनला दिली आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, आगीमुळे ही इमारत एकाबाजूला झुकली आहे तसंच ती कधीही कोसळू शकते. 2016मध्ये ग्रेनेफेल रहिवाशी संघटनांनी इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजन नसल्याची तक्रार केली होती तसंच आगीपासून बचाव करण्यासाठीचे पर्यायही रहिवाश्यांना सांगितले गेले नव्हते. आज घडलेली घटना बांधकामातील अयोग्यता आणि अकार्यक्षमपणा उघड करणारी आहे असं, बीबीसीचे प्रतिनिधी अॅन्डी मुरे यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे.
#WATCH: Fire engulfs 27-storey tower block in Latimer Road, west London. 40 fire engines & 200 firefighters at the spot. pic.twitter.com/OeRK7P33g9
— ANI (@ANI_news) June 14, 2017