VIDEO - ट्रम्प यांच्या विरोधात विद्यार्थांनी जाळले झेंडे
By admin | Published: November 10, 2016 07:12 AM2016-11-10T07:12:35+5:302016-11-10T07:12:35+5:30
ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील विद्यापिठात त्यांच्या विरोधात विद्यार्थांनी अमेरिकेचे झेंडे जाळून त्यांचा विरोध दर्शवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिंग्टन, दि. १० : अत्यंत अटीतटीने आणि व्यक्तिगत त्वेषाने लढल्या गेलेल्या निवडणुकीत राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड जॉन ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुरब्बी राजकारणी हिलरी क्लिंटन यांचा अनपेक्षित पराभव करून अमेरिका या जगातील बलाढ्य राष्ट्राचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान पटकाविला आहे. पण त्यांच्या विरोधाला सुरूवात झाली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील विद्यापिठात त्यांच्या विरोधात विद्यार्थांच्या एका ग्रुपने अमेरिकेचे झेंडे जाळून त्यांचा विरोध दर्शवला आहे.
वाशिंगटन डि.सी येथे अमेरिकेचे लहान आकाराचे ध्वज जाळत विद्यार्थांनी ट्रम्प यांच्या विजयाचा विरोध दर्शवला. यावर विद्यापिठाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, अंदोलन करताना विद्यार्थांनी फक्त घोषणा दिल्या आणि निषेध नोदंवला आहे. त्यांनी त्यांच्या freedom of speech (बोलण्याचे स्वातंत्र) अधिकारानुसारचं अंदोलन केले आहे. यावेळी त्यांनी कोणतेही हिंसक अंदोलन केले नाही.
७० वर्षांचे ट्रम्प हे पहिल्यांदाच निवडणूक लढवून राष्ट्राध्यक्ष होणारे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नेते असून पुढील चार वर्षे अमेरिकेची सत्तासूत्रे त्यांच्या हाती असतील. येत्या जानेवारीत मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून ट्रम्प औपचारिक सूत्रे स्वीकारतील.
Flag burning at American University. Wow. pic.twitter.com/V0NZsfNMyz
— Maddy (@madelineele) November 9, 2016