VIDEO- धक्कादायक! एअरलाइन्स कर्मचा-यांनी प्रवाशाला फरफटत नेले विमानाबाहेर

By admin | Published: April 11, 2017 11:30 AM2017-04-11T11:30:58+5:302017-04-11T11:30:58+5:30

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून एका प्रवाशाला जबरदस्तीनं फरफटत बाहेर काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

VIDEO-Stunning! Airlines employees took the stroll away from the plane | VIDEO- धक्कादायक! एअरलाइन्स कर्मचा-यांनी प्रवाशाला फरफटत नेले विमानाबाहेर

VIDEO- धक्कादायक! एअरलाइन्स कर्मचा-यांनी प्रवाशाला फरफटत नेले विमानाबाहेर

Next

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 11 - अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून एका प्रवाशाला जबरदस्तीनं फरफटत बाहेर काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व प्रकाराचा सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे एअरलाइन्ससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

एअरलाइन्सच्या कर्मचा-यांची विमानातील प्रवाशांशी गैरवर्तणुकीची महिन्याभरातील ही दुसरी घटना समोर आली आहे. शिकागोहून लुइसविलेमार्गे केंटुकीला जाणारं विमान 3411मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रवाशाला ज्या प्रकारे फरफटत बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे लोकांना राग अनावर झाला आणि ट्विटरवरून लोकांनी संताप व्यक्त केला.

एका व्यक्तीनं या घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, विमानातून कशा प्रकारे एअरलाइन्सचे कर्मचारी प्रवाशाला फरफटत बाहेर काढतायत हे यात पाहायला मिळतं आहे. विमान आधीच जास्त भरलं होतं आणि एअरलाइन्स क्रूच्या इतर सदस्यांनाही त्याच विमानातून प्रवास करायचा असल्यानं कर्मचा-यांनी प्रवाशासोबत असा गैरप्रकार केला.

प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर युनायटेड एअरलाइन्सनं विमान ओव्हरबुक झाल्याची बाब पुढे केली. युनायटेड एअरलाइन्सचे प्रवक्ते चार्ली होबर्ट म्हणाले, आमच्या टीमनं प्रवाशांना आवाहन केलं होतं की तुम्ही स्वतःहून विमानातून खाली उतरा, कारण विमान क्षमतेपेक्षा जास्त भरलं होतं. मात्र एका प्रवाशानं विमानातून उतरण्यास नकार दिला. विमान क्षमतेपेक्षा जास्त भरल्यानं आम्ही माफी मागतो.

तर विमानातील एका प्रवाशानं सांगितलं की, सुरक्षारक्षकांनी जबरदस्तीनं एका प्रवाशाला त्याच्या जागेवरून उठवलं आणि फरफटत त्याला बाहेर नेलं. त्या प्रवाशाच्या तोंडातून रक्त येत होतं. अशाच प्रकारे दोन्ही महिन्यांपूर्वी मुलींना त्यांच्या पेहरावावरून विमानात घेण्यास मज्जाव केला होता. एकंदरीत एअरलाइन्सच्या कर्मचा-यांचा मुजोरपणा या सर्व प्रसंगातून समोर आला आहे.  

Web Title: VIDEO-Stunning! Airlines employees took the stroll away from the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.