Video: तालिबानचा क्रुर चेहरा, हेलीकॉप्टरला लटकवला अमेरिकेला मदत करणाऱ्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 06:57 PM2021-08-31T18:57:11+5:302021-08-31T18:57:33+5:30

Afghanistan Crisis: सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अफगाणिस्तानातील कंधारमधील असल्याची माहिती आहे.

Video: Taliban's brutal face, US aid worker's body hanged to helicopter | Video: तालिबानचा क्रुर चेहरा, हेलीकॉप्टरला लटकवला अमेरिकेला मदत करणाऱ्याचा मृतदेह

Video: तालिबानचा क्रुर चेहरा, हेलीकॉप्टरला लटकवला अमेरिकेला मदत करणाऱ्याचा मृतदेह

Next

काबुल: 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानात सत्ते आलेल्या तालिबाननं आपली क्रुर बाजू दाखवण्यास सुरुवात केली आहे. काल म्हणजेच सोमवारी रात्री अमेरिकन सैन्यानं पूर्णपणे अफगाणिस्तानातू माघार घेतली. यानंतर, अफगाणिस्तान जल्लोष साजरा केला. दरम्यान, तालिबानच्या या जल्लोषाचा एक धक्कादायक व्हिडिओ कंधारमधून समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तालिबान अमेरिकेचं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उडवताना दिसत असून, त्या हेलिकॉप्टरला एक मृतदेह लटकवलेला दिसत आहे. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये हेलीकॉप्टरला लटकवलेला व्यक्ती अमेरिकेला मदत करणाऱ्यांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. कारण, अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबाननं सार्वजनिक माफी जाहीर केली असली, तरी अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना मारले जात असल्याच्याही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. 

दरम्यान, हे हेलीकॉप्टर कोन उडवत आहे आणि त्याला कुणाचा मृतदेह लटकवलेला आहे?, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच, तालिबानी सैनिक हेलिकॉप्टर उडवण्याइतके ट्रेंड आहेत? असाही प्रश्न समोर येतोय. यापूर्वीही अनेकदा तालिबानी सैनिक अफगाण सैन्याचे हेलीकॉप्टर्स आणि विमानांसोबत दिसले आहेत.

अमेरिकेची हत्यारं तालिबानच्या ताब्यात
अमेरिकेनें अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान अफगाण सैन्याला अब्जो डॉलरच्या हत्यारांसह विमान, इंबरर इएमबी 314 सुपर टुकानों लाइट एअरक्राफ्ट, ब्लॅक हॉक हेलीकॉप्टर, एमडी-530एफ हेलीकॉप्टर, सेसना 208 जहाज, बेल यूएच-1 हेलीकॉप्टर दिले होते. या सर्व वस्तु आता तालिबानच्या ताब्यात आहेत. पण, काही जाणकारांच्या मते तालिबानकडे या वस्तु चालवू शकतील, इतके हुशार लोक नाहीत.
 

Web Title: Video: Taliban's brutal face, US aid worker's body hanged to helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.