Video : थरार...धावपट्टी दिसली नाही; तरीही ढगातून सुरक्षित उतरविले विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 07:17 PM2019-08-02T19:17:09+5:302019-08-02T19:17:45+5:30
साधारण रनवेपासून जास्त उंचीवर ढग असतात. यामुळे दृष्यमानता कमी असली तर विमाने माघारी फिरविली जातात किंवा जवळच्या विमानतळावर उतरविली जातात.
लंडन : ब्रिटनमध्ये गुरुवारी दुबईच्या एमिरेट्सच्या विमानाने थरारक लँडिंग केले आहे. रनवेपासून कमी उंचीवर ढग असताना विमानाच्या पायलटने ढगातून येत विमान सुखरूप रनवेवर उतरविले आहे.
साधारण रनवेपासून जास्त उंचीवर ढग असतात. यामुळे दृष्यमानता कमी असली तर विमाने माघारी फिरविली जातात किंवा जवळच्या विमानतळावर उतरविली जातात. मात्र, लंडनमध्ये काल अरब एमिरेट्सच्या पायलटने धाडसाने विमान उतरविले आहे. या घटनेचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. कंपनीने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत 10 लाख लोकांनी पाहिलेही आहे.
Now that’s how you make a grand entrance. Video credit: Tom Jones pic.twitter.com/ojAOguED4D
— Emirates Airline (@emirates) July 31, 2019