#Video : जेव्हा चालु सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्याबाहेर येतो! पाहा काय होतं असेल प्रेक्षकांचं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:39 PM2017-11-28T12:39:22+5:302017-11-28T12:50:23+5:30

सर्कशीची मजा प्रत्येक जण घेत असताना अचानक वाघ पिंजऱ्याबाहेर आला.

video : tiger comes out from jail in circus | #Video : जेव्हा चालु सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्याबाहेर येतो! पाहा काय होतं असेल प्रेक्षकांचं ?

#Video : जेव्हा चालु सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्याबाहेर येतो! पाहा काय होतं असेल प्रेक्षकांचं ?

googlenewsNext
ठळक मुद्देबंद पिंजऱ्यात असलेल्या वाघाला पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना पाहून वाघ बिथरला आणि सैरावैरा पळु लागला.पिसाळलेल्या वाघाला पाहून उपस्थित लोकांची चांगलीच धावपळ झाली आणि यात दोन लहान मुलं जखमी झाली.हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता बराच व्हायरल झाला आहे. अनेक प्राणी प्रेमींनी यावर आक्षेपही नोंदवला आहे.

शांग्जी : चीनच्या एका गावात सर्कस बघणं लोकांना प्रचंड महागात पडलं आहे. बंद पिंजऱ्यात असलेल्या वाघाला पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना पाहून वाघ बिथरला आणि वाघ पिंजरा सोडून इतरस्त्र सैरावैरा पळू लागला. वाघाने पिंजरा तोडला हे पाहून लोकांनी आपला जीव मुठीत घेऊन धावायला सुरुवात केली. 

चीनच्या शांग्जीमध्ये लिनफेन या गावात २५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. या घटनेचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत दिसत आहे, त्यानुसार एका सर्कसमध्ये वाघाला बंद पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. वाघाचा बंद पिंजऱ्यातला खेळ सुरू असताना त्याने अचानक पिंजरा सोडला. वाघ पिसाळेलला पाहून तिकडे उपस्थित लोकांचीही चांगलीच धावपळ झाली. या घटनेमुळे दोन लहान मुलं जखमी झाली होती, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. एका गावात जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रेनिमित्त गावकऱ्यांनी हा सर्कशीचा खेळ ठेवला होता. वाघ बंद पिंजऱ्यात असला तरी त्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली नसल्याचेही समोर येत आहे. मात्र वाघ पिसाळला तेव्हा सर्कशीतील कर्मचारी आणि मालकाने झटपट करून त्याला पुन्हा पिंजऱ्यात डांबले. 

पाहा व्हिडीयो - खायला देण्यासाठी आलेल्या माणसाचा हात वाघाने धरून ठेवला

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता बराच व्हायरल झाला आहे. अनेक प्राणी प्रेमींनी यावर आक्षेपही नोंदवला आहे. कोणत्याही सर्कसमध्ये कोणत्याही प्राण्याचा खेळ दाखवणं हे चुकीचं असल्याचं म्हटलं जातंय. त्यातही हिंस्र प्राणी पिंजऱ्यात बंद राहूच कसे शकतात? सतत धावत पळत असणारे वाघ एका छोट्याशा बंद पिंजऱ्यात राहू कसे राहणार? म्हणूनच सर्कसमध्ये असे हिंस्र प्राणी घेताच कामा नये. या घटनेत वाघ पिसळला असला तरीही कोणाला जास्त इजा झाली नाही, पण पुढच्या असं काही घडलं तर कदाचित अनर्थ घडू शकतो. काही दिवसांपूर्वी चीनमध्येच असा प्रकार घडला होता. सर्कशीतल्या एका भुकलेल्या वाघाला एका इसमाने खाण्यासाठी पदार्थ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये त्या माणसालाच वाघाने जखमी केले होते. 

सौजन्य - www.dailymail.co.uk

Web Title: video : tiger comes out from jail in circus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.