VIDEO: सापांच्या विळख्यात अडकलेल्या घोरपडीचा थरार
By admin | Published: November 8, 2016 09:40 AM2016-11-08T09:40:04+5:302016-11-08T13:31:11+5:30
सापांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी घोरपड नजरचुकीने जाते. पण सर्व साप एकत्रितपणे या घोरपडीवर तुटून पडतात, हा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि अचानक तिथे साप दिसला तर काय परिस्थिती होईल. सर्वात पहिली प्रतिक्रिया असेल ती म्हणजे तिथून दूर जाईन किंवा पळत सुटेन. पण एखाद्या ठिकाणी फक्त आणि फक्त विषारी सापच असतील आणि त्या ठिकाणी जर कोणी अडकला तर काय होईल ? तो माणूस किंवा प्राणी पुन्हा जिवंत येण कठीणच. असाच काहीसा थरार एका व्हिडीओतून समोर आला आहे. ज्यामध्ये एक घोरपड सापांच्या विळख्यात अडकते. पण तरीही हार न मानता ती तेथून पळ काढते आणि आपला जीव वाचवते. हा सर्व थरार व्हिडीओत कैद झाला असून सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
ही घोरपड समुद्रकिनारी बसलेली असते. अचानक मागून सापाने केलेल्या हल्ल्यामुळे घोरपड दचकते आणि जीव वाचवण्यासाठी पळत सुटते. पण एवढ्यावरच संकट टळलेलं नसतं. कारण त्या ठिकाणी सापांचं वास्तव्य असतं, एकामागून एक साप बाहेर पडायला सुरुवात होते. सर्व साप घोरपडीला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. एका वेळेला तर ही घोरपड सापांच्या विळख्यात सापडतेदेखील, पण तरीही ती लढते आणि सुटका करुन घेते.
Amazing footage: a hatchling sea iguana makes a run for its life to the safety of the shore, but will it escape the runner snakes? pic.twitter.com/c9zIhyed4y
— Rob S⬅︎Silver Surfer (@RobPulseNews) 6 November 2016
घोरपड धावत असताना पाहून अंगावर अक्षरक्ष: काटा उभा राहतो. एका वेळेला तर ही घोरपड नक्की सापांच्या तावडीत सापडणार असं वाटू लागतं. पण घोरपड प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी सुरक्षित ठिकाणी पोहोचते. छोट्याशा गोष्टींमुळे हार मानणा-यांना हा व्हिडीओ नक्कीच प्रेरणादायी ठरु शकतो.