VIDEO - समजून घ्या अमेरिकेच्या घातक GBU-43 बॉम्बच्या स्फोटाचे परिणाम
By admin | Published: April 14, 2017 12:54 PM2017-04-14T12:54:27+5:302017-04-14T13:40:49+5:30
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ख-या अर्थाने दहशतवादाविरुद्ध लढाई सुरु केली.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 14 - अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ख-या अर्थाने दहशतवादाविरुद्ध लढाई सुरु केली. या लढाईत अमेरिकेने गुरुवारी प्रथमच आपल्या शक्तीशाली GBU-43 अस्त्राचा वापर करुन संपूर्ण जगाला धक्का दिला. अणवस्त्रविरहीत अमेरिकेचा हा सर्वात शक्तीशाली बॉम्ब आहे. अणूबॉम्ब प्रमाणे या बॉम्बमुळे पुढच्या पिढयांमध्ये शारीरीक व्यंग निर्माण होणार नसले तरी, प्रचंड विध्वंस घडवण्याची क्षमता यामध्ये नक्कीच आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानच्या पूर्वभागात इसिसचे तळ नष्ट करण्यासाठी 21 हजार पाऊंडसचा हा बॉम्ब फेकला. जाणून घेऊया GBU-43 बद्दल
- GBU-43 बॉम्बची सर्वप्रथम मार्च 2003 मध्ये चाचणी घेण्यात आली. इराक युद्ध सुरु होण्याच्या काही दिवस आधी ही चाचणी घेण्यात आली. इराककडे रासायनिक शस्त्र असल्याचा दावा करुन अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी इराकवर हल्ला केला.
- 21 हजार पाऊंड म्हणजे 9525 किलो वजनाचा हा बॉम्ब होता.
- या बॉम्बची लांबी 30 फूट असून, 40.5 इंच व्यास आहे.
- हा सॅटलाईड गाईडेड स्मार्टबॉम्ब असल्यामुळे यामध्ये अचूकता जास्त असते. जमिनीपासून 6 मीटर उंचीवर हवेतच या बॉम्बचा स्फोट होता. त्यामुळे याची परिणामकारकता जास्त असते.
- GBU-43 ची "मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अशी ओळख असली तरी, हा सर्वात मोठा बॉम्ब नाही. T-12a हा 19800 किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा बॉम्ब आहे. क्लाऊडमेकर म्हणून हा बॉम्ब ओळखला जातो.
- मदर ऑफ ऑल बॉम्ब GBU-43 च्या तुलनेत अणू बॉम्बचे वजन कमी असते. जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेला अणूबॉम्ब 14,500 टनाचा होता.
- GBU-43 स्फोटानंतर १ हजार यार्डामध्ये आगीच्या ज्वाळा पसरतात.
- १ मैल परिसरातील लोकांना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाइट्स, वाहने यांना मोठी झळ, हादऱ्याने मृत्यू.
- १.७ मैल परिसरातील लोकांचा धक्क्याने मृत्यू होऊ शकतो. अनेक घरांना/इमारतींना तडे जाऊ शकतात.
- २ मैल परिसरातील लोकांना आवाजाने बहिरेपण येऊ शकते.
- ५ मैल परिसरात भूकंपसदृश धक्के बसतात.
- ३0 मैल परिसरातून या बॉम्बच्या १० हजार फूट उंच पोहोचलेल्या मशरूमच्या आकाराचे धूराचे लोळ दिसतात.
या स्फोटाचे राजकीय जगात परिणाम काय?
- अमेरिकेशी कटुता असणाऱ्या रशियावर मोठा दबाव.
- दक्षिण चीन समुद्रावर दावा करणाऱ्या चीनला इशारा.
- बॉम्बखोर उत्तर कोरियाला अमेरिकेने शक्ती दाखवली.
- दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानला मोठा इशारा.