डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलाने नाक पुसलेल्या रुमालानेच पुसला चेहरा; नेटिझन्सनी केलं Troll - पाहा Video
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 20, 2020 04:14 PM2020-11-20T16:14:22+5:302020-11-20T16:15:50+5:30
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 2.1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे...
वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वकील रुडी गिउलियानी (Rudy Giuliani) यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी जबरदस्त व्हायरल झाला होता. यात एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या केसांतून हेअर डाय निघल्याचे दिसून आले होते. मात्र, आता त्यांचा अत्यंत घाणेरडा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ज्या रुमालाने त्यांनी नाक पुसले, त्याच रुमालाने ते चेहरा पुसतानाही दिसत आहेत.
रुडी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. रुडी गिउलियानी (Rudy Giuliani) यांनी ट्रम्प अभियानातील काही कायदेशीर सल्लागारांसोबत गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी 2020च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (2020 US Presidential Election) मोठ्या प्रमाणावर मतदार घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.
रुडी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान, जेव्हा मोठ्या प्रमाणावर मतदार घोटाळ्याचा आरोप केला होता. तेव्हा त्यांच्या केसांतून डाय निघत होते. त्यांनी जेथे पत्रकार परिषद घेतली तेथे प्रचंड गरमी होती. यामुळे त्यांना घाम येत असल्याने त्यांची डायदेखील निघत होती. नेटिझन्सनी हे पकडले आणि त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली.
रुडी यांच्या संदर्भात एवढी एकच घटना नाही, तर रुडी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने सोशल मिडियावर धमाल उडवली आहे. या व्हिडिओमध्ये रुडी रुमाल काढून शिंकतात आणि नंतर तोच रुमाल फिरवून चेहरा पुसतात दिसत आहेत.
oh my god I missed this pic.twitter.com/OGFzvC80Fy
— Tim Hogan (@timjhogan) November 19, 2020
ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 2.1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ अत्यंत भयानक आसल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओसंदर्भात ट्विटरवर अशा प्रकारच्या रिअॅक्शन्स येत आहेत...
don't do it don't do IT DON'T DO IIIIIIIIT
— @LastThird (@LastThird) November 19, 2020
*folds kerchief booger side out*
Just in case you needed a case study on how Covid-19 and other infectious diseases spread ...
— JA McCoy (@MogulNoir) November 20, 2020
🤦🏽♀️#WreckItRudy#TrainwreckChallengehttps://t.co/6CafFfmuxk
पत्रकार परिषदेदरम्यान, रुडी यांनी ' माय कझन विनी'मधील एका दृष्यावर अभिनयही केला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
Giuliani's "evidence" of fraud remains pathetically weak pic.twitter.com/aj4VZSsCry
— Aaron Rupar (@atrupar) November 19, 2020