Video: इमारत कापडाची होती? पाकिस्तानात 16 मजली ट्रेड सेंटर धू-धू करून जळाले; विझविताही नाही आली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 09:51 AM2023-03-12T09:51:26+5:302023-03-12T09:51:59+5:30
आग विझविण्यासाठी १२ हून अधिक अग्निशमन दलाचे बंब होते. परंतू, यश आले नाही.
कराचीमध्ये शनिवारची रात्र अग्निकांडाची रात्र ठरली आहे. पोर्टवे ट्रेड सेंटरची १६ मजली इमारत जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेट एक व्यक्त जखमी झालेला असला तरी एवढी मोठी इमारत जळाली कशी? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. इमारतीच्या वर असलेल्या होर्डिंगला आधी आग लागली आणि नंतर संपूर्ण इमारतीत पसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आग विझविण्यासाठी १२ हून अधिक अग्निशमन दलाचे बंब होते. परंतू, यश आले नाही. एएनआयच्या वृत्तानुसार पाणी पुरविण्यासाठी अनेक पाण्याचे टँकर आणि दोन वॉटर बाउझरही घटनास्थळी होते. या इमारतीच्या शेजारी पेट्रोल पंप होता. पोर्टवे ट्रेड सेंटर नावाच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर काही लोक होते. त्यांना वाचविण्यात आले तर एकाने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. तो जखमी झाला आहे.
Fire erupted in a building near Nursery at main Shahrah-e-Faisal, Karachi pic.twitter.com/HKGx7fFztB
— Naimat Khan (@NKMalazai) March 11, 2023
जियो न्यूजनुसार या इमारतीमध्ये अनेक ऑफिसेस आहेत. सुरुवातीला आग इमारतीचे नाव असलेल्या होर्डिंगवर लागली होती. या बिलबोर्डात स्फोट झाला आणि ही आग इतरत्र पसरल्याचे सांगितले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.