VIDEO: पॅराशूटशिवाय ल्यूकने घेतली २५ हजार फुटांवरून उडी

By admin | Published: July 31, 2016 06:02 PM2016-07-31T18:02:11+5:302016-07-31T18:08:51+5:30

ल्यूक आयकिन्स (४२) या धाडसी व्यक्तिने शनिवारी पॅराशूटचा आधार न घेता २५ हजार फूट (७,६२० मीटर) उंचीवरून उडी घेऊन जाळीमध्ये सुखरूप उतरून इतिहास घडविला.

VIDEO: Without parasit, Luke took 25,000 feet off | VIDEO: पॅराशूटशिवाय ल्यूकने घेतली २५ हजार फुटांवरून उडी

VIDEO: पॅराशूटशिवाय ल्यूकने घेतली २५ हजार फुटांवरून उडी

Next

ऑनलाइन लोकमत
लॉस एंजिलिस, दि. ३१ : ल्यूक आयकिन्स (४२) या धाडसी व्यक्तिने शनिवारी पॅराशूटचा आधार न घेता २५ हजार फूट (७,६२० मीटर) उंचीवरून उडी घेऊन जाळीमध्ये सुखरूप उतरून इतिहास घडविला. दक्षिण कॅलिफोर्नियातील व लॉस एंजिलिसच्या पश्चिमेस सिमी व्हॅलीत हा धाडसी प्रयोग झाला. ल्यूकच्या नावावर तब्बल १८ हजार उड्यांचा अनुभव आहे.

ल्यूक १०० फूट बाय १०० फूट (३० मीटर बाय ३० मीटर) आकाराच्या जाळीत उतरला. अशा धाडसी उड्या घेण्यामध्ये त्याने २६ वर्षांपासून करिअर केले आहे. ही उडी त्याची सर्वात उंचीवरील व पॅराशूट किंवा विंगसूूट न घेता वैयक्तिक आणि जागतिक विक्रम ठरली आहे, असे त्याचा प्रवक्ता जस्टीन अ‍ॅक्लिन यांनी ई मेलद्वारे कळविले. 

 

विमानाच्या साहाय्याने त्याने ही उडी घेतली. जमिनीवर येताना त्याचा वेग जवळपास ताशी 193 किमी होता. ल्यूकची ही कामगिरी पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि कुटुंबीय त्याठिकाणी उपस्थित होते. ल्यूकने आयर्नमॅन 3 चित्रपटातही भूमिका केलेली आहे

खूप उंचीवर असल्यामुळे ल्यूकने प्राणवायूचा मुखवटा लावला होता. एका विमानातून त्याने व अन्य तीन पॅराशूटर्सनी खाली झोकून दिले. नंतर त्याने तिघांपैकी एकाच्या हाती प्राणवायुचा मुखवटा दिला. नंतर तीन पॅराशूटर्स ल्यूकपेक्षा वर उडत होते व ल्यूक एकटाच खाली येत होता. ल्यूकची ही उडी दोन मिनिटे चालली.

 

Web Title: VIDEO: Without parasit, Luke took 25,000 feet off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.